महाराष्ट्र बातम्या

Andheri East By-election: राज ठाकरेंच्या माघार घेण्याच्या विनंतीवर फडणवीस म्हणाले, मी...

राज ठाकरे यांच्या पत्रानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

भारतीय जनता पार्टीने अंधेरी पूर्व पोटनिवडणूक लढवू नये असे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहले आहे. सहानुभूतीचा विचार करून येथे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके निवडून कशा येतील? याचा विचार करावा, असं पत्र राज ठाकरेंनी लिहिलं आहे.

राज ठाकरे यांच्या पत्रानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीबाबत राज ठाकरे यांच्या पत्राचा आम्ही विचार करू. पण यासाठी मला मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी लागेल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

पत्रात काय म्हणालेत राज ठाकरे?

राज ठाकरे यांनी पत्रक काढून या निवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचं स्पष्ट केलं आहेत. तसेच भाजपलाही उमेदवार न देण्याचं आवाहन केलं. याबाबत राज ठाकरे यांनी पत्रक काढलं आहे.

राज ठाकरे म्हणाले की, मी एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झाल्यानंतर त्या मतदार संघात निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतो. तसे करणे म्हणजे त्या दिवंगत लोकप्रतिनीधीला श्रद्धांजलीच अर्पण करणे अस मी मानतो. त्यामुळे आपणही तसच करावं, अस आवाहन राज ठाकरे यांनी भाजपला केलं आहे.

मागील अनेक दिवसांपासून राज्यातील राजकीय संस्कृतीचं पतन झाल्याची टीका होत आहे. शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी देखील निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. अनेक पक्षांनी शिवसेना उमेदावर ऋतुजा लटके यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर भाजपने या निवडणुकीत उमेदवार देण्याची ठाम भूमिका घेतली आहे. मात्र राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय संस्कृती अद्याप जिवंत असल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी भाजपलाही उमेदवार न देण्याचं आवाहन केलं आहे. या संदर्भात पत्रत राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे. यावर भाजप काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचं ठऱणार आहे.

दुसरीकडे राज ठाकरे हे भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या जवळ गेल्याच्या चर्चा आहे. भाजपसोबत मनसेची युती होईल, असे अंदाजही बांधले जात आहे. मात्र राज ठाकरे यांनी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिलेला पाठिंबा चर्चेचा विषय ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: स्कूल बसचालकाचा निष्काळजीपणा! बीडमध्ये अपघात; रस्ता ओलांडताना विद्यार्थिनीला दुचाकीची जोराची धडक, मुलगी जखमी

Mumbai News : पर्यटनस्थळाचा प्रचार हा एकमेव उद्देश; असुरक्षित कृतींना कोणतेही प्रोत्साहन नाही – पर्यटन विभाग

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

Thane News: नवी मुंबई ते कल्याण प्रवास आणखी वेगवान होणार! ऐरोली-कटाई उन्नत रस्ता प्रकल्पाचा टप्पा कधी खुले होणार? जाणून घ्या...

Union Minister: वारे मंत्री महोदय! स्वतःच्याच खात्याची सबसिडी उचलली; पंतप्रधान मोदी अ‍ॅक्शन घेणार का?

SCROLL FOR NEXT