Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

चिक्की घोटाळ्याबाबत न्यायालय काय म्हणाले त्याबद्दल माहिती नाही - देवेंद्र फडणवीस

"राजकारणात काम करणाऱ्या लोकांना रचनात्मक काम करत नाही तोपर्यंत लोकप्रियता मिळत नाही"

रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: चिक्की घोटाळ्याबाबत (chikki scam) न्यायालय (court) काय म्हणाले आहे मला माहिती नाही. माहिती घ्यावी लागेल, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी आज सांगितले. साकीब गोरे (sakib gore) यांच्या दृष्टी संवर्धन कार्यावर लघुपटचा लोकार्पण सोहळा देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पार पडला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना चिक्की घोटाळ्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.

एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत पाच वर्षापूर्वी झालेल्या निक्रृष्ट दर्जाच्या चिक्की वाटप घोटाळ्यात (chikki scam) अद्यापही खासगी पुरवठादारांवर (private suppliers) एफआयआर दाखल (FIR ) का केला नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court) राज्य सरकारला केला. भाजपचे सरकार (bjp government) असताना घडलेल्या या चिक्की घोटाळ्याचे प्रकरण पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

"राजकारणात काम करणाऱ्या लोकांना रचनात्मक काम करत नाही तोपर्यंत लोकप्रियता मिळत नाही. या लघुपटातील चेहरे बोलके होते. आमच्या सरकारमध्ये महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त करण्याचे ठरवले होते. साडे सातारा लाख लोकांना मोतीबिंदू मुक्त करण्याचा मानस होता. साडे पंधरा लाख लोकांचे मोतीबिंदू ऑपरेशन आम्ही केले. आपल्या गरजा भागवून समाजाला दिले पाहिजे" असे फडणवीस म्हणाले.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी येत्या 20 तारखेला दिल्लीत बोलावलेल्या यूपीएच्या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. यावर देवेंद्र फडणवीस यांनी, ते सहभागी होऊ द्यात मग बोलतो असे उत्तर दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT