महाराष्ट्र

'...नाहीतर भुजबळ तुमचा दाभोळकर, पानसरे करू'

सकाळवृत्तसेवा

नाशिक- राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका निनावी पत्राद्वारे ही धमकी मिळाली आहे. मनुस्मृतीला विरोध केला तर तुमचा पानसरे दाभोलकर करू अशा स्वरुपाचा आशय या पत्रात लिहण्यात आला आहे.

या पत्रात पुढे छगन भुजबळ यांना म्हटले आहे की, भुजबळ सातत्याने संभाजी भिडे यांच्याबद्दल तू चुकीची भाषा वापरत आहेस. तुला गुरुजींचे कार्य कधी कळणार, तुझी लायकी नाही गुरुजींबद्दल असे बोलायची. तू आम्हाला शिवाजी आणि संभाजी महाराजांचा इतिहास शिकवायची गरज नाही, आमचे गुरुजी जे सांगतील तोच आमच्यासाठी त्यांचा इतिहास असेल असेही या पत्रात म्हटले आहे. तू आताच मरता मरता वाचलास, राहिलेले थोडे दिवस व्यवस्थित जग. तुझ्या भुजात आता बळ राहिलेले नाही त्यामुळे शांत रहा असेही या पत्रात म्हटले आहे. 

तसेच, या पत्रात जगात सर्वात श्रेष्ठ ग्रंथ हा मनुस्मृती असल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे आणि मनुस्मृती या श्रेष्ठ ग्रंथाचे नाव भुजबळांच्या तोंडातूनही निघणे अपेक्षित नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच फुले आणि आंबेडकर यांचाही उल्लेख या पत्रात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर, तुला संपवायला आम्हाला वेळ लागणार नसल्याचेही या पत्रात म्हटले आहे. तर संभाजी भिडेंचे नाव तुझ्या तोंडून निघाले तर तुझाही दाभोळकर पानसरे झालाच समज अशी धमकी शेवटी या पत्रात देण्यात आली आहे.

दरम्यान, काही वेळातच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी पोलिस आयुक्तांची भेट घेणार आहेत. भेटीत ते या पत्राविषयी माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT