sai sansthan esakal
महाराष्ट्र बातम्या

2000 Note : दोन हजारांच्या नोटा दानपेटीत टाकू नयेत, साई संस्थानकडून आवाहन; 'एवढ्या' नोटा आहेत पडून

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगरः काल आरबीआयने दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या चार महिन्यांमध्ये नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या नोटा बदलून मिळणार आहेत. नोट बंद झाल्याने काही लोक दानपेटीत पैसे टाकण्याचा प्रयत्न करतात. मात्र साई संस्थानने भाविकांना एक आवाहन केलं आहे.

२०१६ साली जेव्हा नोटबंदी झाली. तेव्हा साई संस्थानसह देशातील देवस्थानांच्या दानपेटीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंद झालेल्या नोटा टाकण्यात आलेल्या होत्या. सध्या साई संस्थानकडे बंद पडलेल्या तीन कोटी रुपयांच्या नोटा पडून असल्याचं सांगितलं जातं.

काल दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णय जाहीर झाल्यानंतर साई संस्थानने दानपेटीत दोन हजारांच्या नोटा न टाकण्याचं भाविकांना आवाहन केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत भाविक दोन हजारांच्या नोटा दानपेटीत टाकू शकतात. त्यानंतर टाकू नयेत, असं निवेदनात सांगण्यात आलेलं आहे.

दोन हाजारांच्या नोटा येत्या ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असं आरबीआयने जाहीर केलं आहे. २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत नोटा बँकेत जमा करुन बदलण्याची मुदत असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे. कुठलीही गोंधळाची किंवा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी चार महिन्यांचा कालावधी नोटा बदलीसाठी देण्यात आलेला असल्याचं RBI ने स्पष्ट केलं. फक्त एकावेळी २० हजार रुपये बदलता येणार आहेत.

नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला होता. तेव्हा सर्वात मोठी असलेली एक हजाराची नोट बंद करुन दोन हजाराची नोट चलनात आणली होती. आता ही सर्वात मोठी असलेली दोन हाजारांची नोट बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

SCROLL FOR NEXT