औरंगाबाद - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे औरंगाबाद विमानतळाव आगमन झाले. त्यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे. ( छायाचित्र - सचिन माने) 
महाराष्ट्र बातम्या

काही काळजी करु नका, सरकार व्यवस्थित चालू आहे : अजित पवार

सचिन माने, गणेश पिटेकर

आघाडी सरकार व्यवस्थित काम करतयं. आम्ही त्या सरकारच्या पाठीशी आहोत. अस काँग्रेसने सांगितलं. राष्ट्रवादीने आणि शिवसेनेनेही सांगितलं आहे. सध्या कुठल्याही निवडणुका नसल्यामुळे त्यावर फार चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

औरंगाबाद : तुम्ही काही काळजी करु नका. कोणी कोणाबरोबर चर्चा करत असलं तरी देखील सध्या सरकार व्यवस्थितपणे चालू आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांनी सांगितले. आज शुक्रवारी (ता.१८) बीड व उस्मानाबादच्या दौऱ्यावर औरंगाबाद येथील विमानतळावरुन Aurangabad Airport रवाना होताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. श्री.पवार म्हणाले, की प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला इतरांशी चर्चा करण्याचा अधिकार आहे. हे लोकशाहीचे लक्षण आहे. लोकशाहीमध्ये या सर्व घटना घडत असतात. परंतु नाना पटोले जरी चर्चा करत असले तरी त्यांनी स्पष्ट सांगितलं, की आघाडी सरकार व्यवस्थित काम करतयं. आम्ही त्या सरकारच्या पाठीशी आहोत. अस काँग्रेसने Congress सांगितलं. राष्ट्रवादीने Nationalist Congress Party आणि शिवसेनेनेही Shiv Sena सांगितलं आहे. सध्या कुठल्याही निवडणुका नसल्यामुळे त्यावर फार चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. सध्या कोरोनाचCorona सावट आहे. ते कसं दूर होईल. Don't Worry, Government Works Properly, Said Ajit Pawar

आता पाऊस वेगवेगळ्या भागांमध्ये सुरु झालेला आहे. लोकांना बियाण, खतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळतील याच कामाला राज्य सरकारने अग्रक्रम दिलेला आहे. माझी माध्यमांना विनंती आहे, की आम्ही ज्याच्या मध्ये लक्ष देतोय, बाकीच्या हा असा म्हटला, तुमच काय मत आहे, त्याच्यात फार लक्ष देण्याची गरज नाही. ते तर चालूच राहते. ते एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिक मांडण्याचा अधिकार आहे, असे मत नाना पटोले यांच्याबाबत श्री. पवार यांनी व्यक्त केले. शिवसेना व भाजपमध्ये मुंबईत राडा झाला. त्यावर ते म्हणाले, कुठलाही पक्ष असा गुंड वगैरे म्हणून घेणार नाही. कारण आज राज्याचे प्रमुख शिवसेनेचे नेते आहेत. कायदा सुव्यवस्था ठेवणे कायद्याने राज्य चालवणे आणि आपल्या सहकार्यांना बरोबर घेणे, तशा प्रकारचे काम मुख्यमंत्री करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palghar News: पाणी उशिरा आणलं म्हणून शिक्षकांकडून मारहाण; घाबरलेली लेकरं जंगलात पळाली अन्..., पालघर ZP शाळेतील घटना

Bihar : कॉर्पोरेटमधली नोकरी सोडून नेत्याचा मुलगा राजकारणात उतरला, निवडणूक न लढता थेट मंत्रि‍पदी वर्णी; आई आमदार, मुलगा मंत्री

Asia Cup Rising Stars: भारत अन् पाकिस्तान संघ सेमीफायनलमध्ये! कसे आहे वेळापत्रक, कुठे पाहाणार सामने?

Gadhinglaj News: गडहिंग्लज पालिका ; सत्तेच्या सोपानासाठी मोहऱ्यांची मोलाची भूमिका, निवडणूक रिंगणात बहुतांशी नवे चेहरे

Thane News : कोपरी 'बीएसयूपी'तील ८११ कुटुंबांना दिलासा! सदनिकांची दीड लाखांची नोंदणी रक्कम १०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT