Gopichand Padalkar Dhangar Reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Gopichand Padalkar : 'डॉ. आंबेडकरांनी आम्हाला आधीच आरक्षण दिलंय, त्याच्या आडवं येणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही'

आम्हाला आरक्षण देण्याची कोणत्याही सरकारला गरज नाही.

सकाळ डिजिटल टीम

शरद पवार यांच्यामुळे आम्हाला न्याय मिळू शकला नाही. धनगर जागा झाल्यास प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकते.

ओरोस : आम्हाला आरक्षण देण्याची कोणत्याही सरकारला गरज नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी ते आरक्षण आधीच आम्हाला दिलेले आहे. केवळ त्याच्या अंमलबजावणीची मागणी आमची आहे, असे स्पष्ट मत आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी व्यक्त केले.

आता ते सुद्धा अंतिम टप्प्यात आले आहे. त्याच्या आडवे येणाऱ्यांना सोडायचे नाही. काहीजण आडवे येण्याची शक्यता आहे. त्यांनाही आडवे करत आरक्षण (Dhangar Reservation) मिळवायचे आहे, असे प्रतिपादनही धनगर समाज नेते आमदार पडळकर यांनी सिंधुदुर्गनगरीत केले.

सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी सभागृहात ‘धनगर आरक्षण जागर यात्रा’ पडळकर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी शिवराज बीडकर, बाळा गोसावी, नवलराज काळे, राजेश जानकर, कानू शेळके, गंगाराम शिंदे, राधिका शेळके, दीपा ताटे, किशोर वरक, सुरेश झोरे, बाळा कोकरे, देऊ जंगले, संतोष साळसकर, अमोल जंगले, सुशील खरात, भरत गोरे आदी उपस्थित होते. यावेळी शामसुंदर मोडक, किशोर वरक, नवलराज काळे, कानू शेळके यांची भाषणे झाली.

पडळकर म्हणाले, ‘१९६१ पासून धनगर आरक्षण प्रश्न प्रलंबित आहे. मी, २०१८ मध्ये आंदोलन हातात घेतले. तेव्हापासून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करीत आहे. परंतु, शरद पवार यांच्यामुळे आम्हाला न्याय मिळू शकला नाही. धनगर जागा झाल्यास प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकते. धनगरांच्या बाजूने मी १७० पुरावे दिले आहेत. निकाल १०१ टक्के आपल्या बाजूने लागणार आहे; परंतु, मला शांत बसायचे नाही. मिळालेले आरक्षण लागू करणे, हा ‘प्लॅन ए’ आहे. रस्त्यावर उतरून लढाई करायची, हा ‘प्लॅन बी’ आहे. यासाठी राजकीय पक्ष बाजूला ठेवून आपल्याला एकत्र यायचे आहे.’’

Gopichand Padalkar Dhangar Reservation

अहिल्यादेवी होळकर योजनेसाठी प्रस्ताव द्या

धनगर समाजाच्या वस्ती जोडणाऱ्या रस्त्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जोडरस्ते योजना’ शासन आणत आहे. यासाठी अन्य दोन भटक्या विमुक्त जातीसाठी पाच हजार कोटींचा निधी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रस्ताव करावेत. जिल्ह्यातील मोठी लोकसंख्या असलेल्या धनगर वस्तीत सामाजिक भवन उभारले जाणार आहे. धनगर समाजाला २५ हजार घरे दिली जाणार आहेत. घरकुल योजनेसाठी जागा नसल्यास शासन ५० हजार रुपये जागा खरेदी करण्यासाठी निधी देत आहे. याचा समाजाने लाभ घ्यावा, असे आवाहन पडळकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT