Prakash Ambedkar and Sharad Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar: 'लग्न एकाशी, संसार दुसऱ्याशी'; प्रकाश आंबेडकरांची मीम शेअर करत शरद पवारांवर बोचरी टीका

मणिपूरमध्ये राज्य पुरस्कृत हिंसाचार सुरू असताना पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार देण्यासाठी उपस्थित असलेल्या शरद पवार यांच्यावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Prakash Ambedkar

मुंबई- मणिपूरमध्ये राज्य पुरस्कृत हिंसाचार सुरू असताना पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिळक पुरस्कार देण्यासाठी उपस्थित असलेल्या शरद पवार यांच्यावर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे ट्विट मध्ये Meme चा वापर करत शरद पवारांवर टीका करण्यात आली आहे. 'जेव्हा तुम्ही गोष्टी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहता, तेव्हा तुम्हाला कळते की #GormintAunty अगदी बरोबर होती, असं ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

जर तुम्हाला Merchant of Hate, Castism & Death च्या बाजूने जायचे असेल तर खुशाल जा. तुमच्या ब्रेकअप स्टंटने महाराष्ट्र आणि भारतातील लोकांना फसवू नका. #SharadPawar हे नेहमीच दुटप्पी राहिले आहेत. ते लग्न एकाशी करतात आणि संसार दुसऱ्या बरोबर करतात' अशी बोचरी टीका ट्विट मध्ये करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी लोकमान्य टिळक पुरस्कार स्विकारण्यासाठी पुण्यात आले होते. पुरस्कार वितरणावेळी शरद पवार हेही उपस्थित होते. याचा संदर्भ देत प्रकाश आंबेडकर यांनी ही टीका केली आहे.

#GormintAunty मीम्स सोशल मीडियावर अनेकदा वापरला जातो. यामध्ये एक महिला सर्व राजकीय लोक आपल्याला वेड्यात काढत आहेत, असं म्हणत असताना दिसते. याचाच एक टेम्लेट प्रकाश आंबेडकर यांनी शेअर केला आहे. टेम्लेटमध्ये 'ये सब मिलके हमको पागल बना रहे हे' असं म्हणण्यात आलं आहे. प्रकाश आंबेडकरांचा थेट रोख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आहे. आंबेडकर यांना शरद पवार हे दुटप्पी असल्याचं सुचवायचं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी देश पातळीवर 'इंडिया' नावाची आघाडी विरोधकांनी केली आहे. त्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे. शिवाय मणिपूर येथे अशांतता असताना नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कार पुणे येथे स्विकारणार होते. याचा विरोध म्हणून काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीचा एक गट पुण्यात रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार नरेंद्री मोदींसोबत स्टेजवर आणि कार्यकर्ते विरोधासाठी रस्त्यावर असे दृश्य निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: पेट्रोल-डिझेलनंतर LPG दर वाढणार का? देशात इंधनाचा किती साठा शिल्लक? सरकारने संपूर्ण आकडाच सांगितला

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा पुन्हा बदलला, लांबी थेट 856 किमी! आता तुमच्या जिल्ह्यातून जाणार का? पाहा नवीन नकाशानुसार यादी

Kalyan: क्रूरतेची सीमा गाठली! भटक्या कुत्र्यांना मारून नाल्यात फेकलं, केडीएमसीच्या कंत्राटदाराचं कृत्य

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा, इंधनाअभावी अनेक पेट्रोल पंप बंद

महाराष्ट्र सोडण्याच्या विचारात आहेत नाना पाटेकर? भर सभेत मंत्र्यांसमोर केलं विधान, म्हणाले, 'खेड्यातली माणसं...'

SCROLL FOR NEXT