Dr. Shirish Valsangkar sucide case
सोलापूर : येथील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांची सून डॉ. शोनाली वळसंगकर ‘एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स’मधील तिसऱ्या मजल्यावर राहायला गेल्या. त्याठिकाणी पती डॉ. अश्विन व सासू डॉ. उमा वळसंगकर, नणंद नेहा फडके व तिचा पती सुजय फडके यांच्याकडून विरोध होत आहे. या चौघांपासून अंतरिम संरक्षण मिळावे, असा अर्ज डॉ. शोनाली यांनी सोलापूरच्या न्यायालयात केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर सासू-सून, पती-पत्नीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. डॉ. शोनाली या मोदीखाना परिसरातील हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर राहायला गेल्या; पण त्याठिकाणी त्यांना सासरकडील मंडळींनी विरोध केला आणि जबरदस्तीने तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला. यावर डॉ. शोनाली यांनी चौघांपासून अंतरिम संरक्षण मिळावे म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने डॉ. उमा व डॉ. अश्विन वळसंगकर यांच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून, ‘डॉ. शोनाली त्या ठिकाणी खरोखर राहतात किंवा त्यांच्यावर तेथे कौटुंबिक हिंसाचार झाला, असा कोणताही प्रथमदर्शनी पुरावा नाही.
ई-मेल आणि इतर कागदपत्रांवरून त्यांचा रहिवासी पत्ता वेगळा आहे. ३१ डिसेंबर २०२४ नंतर अर्जदाराचे या संस्थेतील हक्क संपुष्टात आले असून त्यांचे सध्याचे कामाचे ठिकाण वेगळे दिसते,’ असे निरीक्षण नोंदविले. कागदपत्रांच्या आधारावर न्यायालयाने डॉ. शोनाली यांचा अंतरिम संरक्षणाचा अर्ज फेटाळला. तसेच सुजय फडके व नेहा फडके हे न्यायालयात हजर नसल्याने त्यांच्याबाबत कोणताही आदेश दिला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
डॉ. उमा, डॉ. अश्विन यांच्या वकिलांचा युक्तिवाद
‘एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स’ची इमारत व्यावसायिक संस्था असून, तिसरा मजला केवळ कामाच्या वेळी तेथील कर्मचाऱ्यांसाठी वापरला जातो. डॉ. शोनालींचा ३१ डिसेंबर २०२४ पासून या संस्थेशी तथा हॉस्पिटलशी संबंध राहिलेला नाही. त्यांच्या कामाचे ठिकाण जुने आरटीओ ऑफिसजवळील भावना अपार्टमेंट येथे स्वतंत्र आहे. तरीदेखील, त्यांनी हॉस्पिटलमध्ये बेकायदा प्रवेश केला, यावरून त्यांच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हादेखील दाखल असल्याची बाजू डॉ. अश्विन व डॉ. उमा यांच्या वकिलांनी कागदपत्रांसह न्यायालयात मांडल्याचेही सूत्रांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.