rain sakal
महाराष्ट्र बातम्या

मुसळधार पावसाने दाणादाण, फळबागांचं नुकसान

कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही फटका

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार हजेरी लावल्याने रब्बी पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पिकांमध्ये पाणी साचल्याने मोठा फटका बसला आहे. पावसाने अक्षरशः डोळ्यांदेखत पिके उद्ध्वस्त झाली असून, उत्पादनावर परिणाम होणार आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने पिकांना जोरदार फटका बसला आहे. पुणे जिल्ह्यात डिसेंबरमध्ये तब्बल सहा वर्षांनंतर मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे पुणे जिल्ह्यात पाऊस आणि थंडीने ५०० पेक्षा अधिक शेळ्या, मेंढ्या आणि पशुधन मृत झाल्याची भीती आहे. तसेच सातारा जिल्ह्यात ही मुसळधारेने दाणादाण उडवली असून, स्ट्रॉबेरी पिकासह रब्बी पिकेही धोक्यात आली आहेत.

तर सांगलीत द्राक्ष बागांमध्ये पाणी साचून नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी द्राक्ष बागा कोलमडून पडल्या आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्वहंगामी द्राक्षे, फुलोरा अवस्थेतील द्राक्ष बागा, डाळिंब, काढणीस आलेला खरीप कांदा व उन्हाळ कांद्याच्या रोपवाटिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने या पावसाने दाणादाण उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यात ही सूर्यदर्शन झालेले नाही. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. प्रामुख्याने पंढरपूर, मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, माळशिरस, सांगोला, करमाळा असा सर्वदूर पाऊस सुरू आहे.

कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत रात्रभर मुसळधार पाऊस होता. त्यामुळे आंबा, काजूसह सर्वच फळपिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

खानदेशात धुळ्यातील साक्री, नंदुरबारमधील नवापूर भागात मध्यम पाऊस झाला. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. मोठा पाऊस कोठेच झाला नाही. मात्र ढगाळ हवामानामुळे पिकांवर कीड, अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

वादळी पाऊस, थंडीमुळे शेळ्या, मेंढ्या दगावल्या

पुणे, सातारा, नगर जिल्ह्यांत पाऊस आणि थंडीमुळे पशूंचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात सुमारे दोन हजार शेळ्या, मेंढ्या दगावल्या आहेत. तर नगर जिल्ह्यात सुमारे शंभराहून अधिक शेळ्या, मेंढ्या दगावल्या. तसेच सातारा जिल्ह्यात ४० शेळ्या, मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात ही सुमारे शंभर जनावरे दगावली आहेत.

या जिल्ह्यांना पावसाचा फटका

  1. पुणे

  2. सांगली

  3. कोल्हापूर

  4. नाशिक

  5. धुळे

  6. सातारा

  7. सोलापूर

  8. सिंधुदुर्ग

  9. रत्नागिरी

  10. नंदुरबार

  11. जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BAN vs AUS: दिल्लीत जन्म, पंजाबमध्ये गिरवले क्रिकेटचे धडे अन् आता थेट ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण... कोण आहे Nikhil Chaudhary?

विदर्भातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी, 'या' एक्सप्रेसमध्ये लागणार LHB कोच, रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय

'हे फक्त आमिरच करू शकतो!' एकाच कारमध्ये दोन सवती आणि होणारी तिसरी बायको! व्हिडिओ पाहून चकित व्हाल

Ramdara Mandir: भाविकांसाठी महत्त्वाची सूचना! रामदरा मंदिर १८ जुलैपर्यंत बंद; गर्भगृहाच्या नूतनीकरणासाठी मोठा निर्णय

Kolhapur Water Crisis : कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' 10 नद्यांवर पुन्हा उपसाबंदी लागू; पाटबंधारे विभागाचा मोठा निर्णय, शेती पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

SCROLL FOR NEXT