Solapur News sakal
महाराष्ट्र बातम्या

दहावी-बारावी परीक्षेवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची नजर! कॉपीमुक्त परीक्षेसंदर्भात बोर्डाच्या सूचना; केंद्राबाहेरील हालचालींचे होणार व्हिडिओ चित्रण

दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रांवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. पण, त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर असणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रांवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला आहे. पण, त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर असणार आहे. याशिवाय परीक्षा केंद्रांबाहेरील हालचालींचे देखील व्हिडिओ चित्रीकरण केले जाईल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या मागच्या वर्षीच्या आदेशानुसार प्रत्येक शाळा- महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक करण्यात आले. त्याची कार्यवाही न करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचाही इशारा त्यातून देण्यात आला. मात्र, तो आदेश आणि कारवाई कागदावरच राहिली. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी विद्यार्थ्यांप्रमाणेच पर्यवेक्षक व केंद्र संचालकांचीही सरमिसळ पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला राज्यभरातून विरोध झाला आणि बोर्डाने एक पाऊल मागे घेत २०१८ ते २०२४ या काळात ज्या केंद्रांवर कॉपी प्रकार आढळले, त्याच केंद्रांवरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक बदलण्याचा सुधारित निर्णय घेतला. आता त्यानुसार परीक्षेची कार्यवाही केली जाणार आहे.

परीक्षेसंदर्भात बोर्डाच्या सूचना...

  • संवेदनशील परीक्षा केंद्रांवर जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेरे लावले जातील

  • परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी सर्व परीक्षा केंद्रांवरील भौतिक सुविधांची पाहणी केली जाईल

  • परीक्षा केंद्रांच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रीकरण केले जाईल

  • परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेसंबंधीतसर्व घटकांचा चेहरा बायोमेट्रिक मशिनमध्ये स्कॅन केला जाईल

  • परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडल्यास त्यास उद्युक्त करणारे, मदत करणारे व गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र, अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल

  • परीक्षा केंद्रापासून ५०० मीटर परिसरात परीक्षा काळात झेरॉक्स सेंटर बंद राहतील

जिल्ह्यातील ८१ केंद्रांवर अदलाबदल

सोलापूर जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या ३४ परीक्षा केंद्रांवर आणि दहावीच्या ४७ केंद्रांवर पर्यवेक्षक व केंद्र संचालक दुसऱ्या शाळांमधील असणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात एकही केंद्र संवेदनशील नसल्याने कोठेही ड्रोन कॅमेऱ्याची गरज भासणार नाही, असे माध्यमिक शिक्षण विभागाने सांगितले. कॉपीमुक्त परीक्षेसाठी सात भरारी पथके असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

"साडी चुरगळू नये म्हणून ती.." प्रसिद्ध डिझायनरचा ऐश्वर्याविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाला..

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

शिक्षक मारहाण प्रकरण! मुंबईच्या महापौर रितू तावडेंना मोठा धक्का; दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार, काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT