drought
drought 
महाराष्ट्र

साडेचार लाख शेतकरी दुष्काळाने बाधित 

संतोष सिरसट

सोलापूर : खरीप हंगामात दुष्काळ जाहीर झालेल्या शेतकऱ्यांचा क्षेत्रनिहाय अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास सादर केला आहे. त्यामध्ये दुष्काळी घोषित न केलेल्या उत्तर सोलापूर व बार्शी या दोन्ही तालुक्‍यांचा समावेशही दुष्काळात करण्याची विनंतीही त्यांनी शासनास केली आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यातील चार लाख 59 हजार 459 शेतकरी दुष्काळाने बाधित झाले आहेत. या नऊ तालुक्‍यातील तीन लाख 16 हजार 696 शेतकऱ्यांचे 50 टक्‍यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. 

ज्याप्रमाणे दुष्काळी जाहीर झालेल्या नऊ तालुक्‍यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास पाठविला आहे. त्याचप्रमाणे उत्तर सोलापूर व बार्शी या दोन्ही तालुक्‍यांचा अहवाल त्याच पद्धतीने शासनाला दिला आहे. 33 ते 50 टक्के नुकसान झालेले क्षेत्र किती, शेतकरी किती, 50 टक्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेले क्षेत्र किती, शेतकरी किती, बारमाही पिकांचे क्षेत्र व शेतकरी किती ही सगळी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर केली आहे. तशाच प्रकारची माहिती वगळलेल्या दोन्ही तालुक्‍यांची दिली आहे. संबंधित तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती शासनास सादर केली आहे. 

33 ते 50 टक्‍यांपर्यंत नुकसान (नऊ तालुके) 
-बाधित शेतकरी संख्या ः एक लाख 42 हजार 763 
- बाधित क्षेत्र ः एक लाख 27 हजार 339 हेक्‍टर 

50 टक्‍यांपेक्षा जास्त नुकसान (नऊ तालुके) 
-बाधित शेतकरी संख्या ः तीन लाख 16 हजार 696 
-बाधित क्षेत्र ः दोन लाख 86 हजार 669 हेक्‍टर 

उत्तर सोलापूर व बार्शी 
-बाधित शेतकरी संख्या ः एक लाख 18 हजार 288 
-बाधित क्षेत्र ः 79 हजार 140 हेक्‍टर 

जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांची स्थिती 
-बाधित शेतकऱ्यांची संख्या ः पाच लाख 77 हजार 747 
-बाधित क्षेत्र ः चार लाख 93 हजार 148 हेक्‍टर 

बाधित क्षेत्र (जिरायती) ः दोन लाख 19 हजार 65 हेक्‍टर 
बाधित क्षेत्र (बागायती) ः एक लाख 98 हजार 770 
बाधित क्षेत्र (बारमाही पिके) ः 75 हजार 313 

खरीप हंगामातील दुष्काळ सूचित केलेल्या तालुक्‍यांची माहिती शासनाला सादर केली आहे. त्यामध्ये दिलेले क्षेत्र व बाधित शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये थोडीफार तफावत असू शकते. उत्तर सोलापूर व बार्शी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनाही दुष्काळी मदतनिधी मिळावा अशी विनंती शासनाला केली आहे. 
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT