Mantralay maharashtra sakal media
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील आणखी ४० मंडलांमध्ये दुष्काळ! तरीपण मंगळवेढा, उत्तर सोलापूर, मोहोळ तालुक्यातील ‘या’ महसूल मंडलांना फटकाच

ज्या महसूल मंडलात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला, अशा ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यास मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता मिळाली. त्यात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर या तालुक्यांमधील ४० मंडल आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत ज्या महसूल मंडलांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला, अशा ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यास मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर या सहा तालुक्यांमधील ४० महसूल मंडलांचा समावेश आहे.

पावसाचा खंड, सरासरीपेक्षा कमी पाऊस, तालुक्यातील पाणी पातळी, जमिनीवरील हिरवळ, प्रकल्पांमधील पाणीसाठा, अशा बाबींचा सॅटेलाईटद्वारे ऑनलाइन सर्व्हे पार पडला. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा व बार्शी या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला.

मात्र, अक्कलकोट व उत्तर सोलापूर वगळता उर्वरित चार तालुके दुष्काळाच्या ट्रिगर-एकमध्ये होते. मात्र, ट्रिगर-दोनमध्ये ११ पैकी पाचच तालुके बसले. त्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उर्वरित सहा तालुक्यांमधील तहसीलदारांकडून वस्तुनिष्ठ अहवाल मागवून घेतले. त्यावर कृषी विभागाकडून आणखी सविस्तर माहिती संकलित करून तो अहवाल सरकारला पाठविण्याची तयारी केली होती.

मात्र, जिल्हाभर दुष्काळी स्थिती असताना केवळ पाचच तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आणि त्यावेळी ‘झळा दुष्काळाच्या, पण निकषांमुळे पंचाईत’ या मथळ्याखाली ‘सकाळ’ने वृत्त मालिका प्रसिद्ध केली. त्यानंतर या प्रश्नाला वाचा फुटली आणि राज्यभरातील सर्व तालुक्यांमधून तशी मागणी झाली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीने अडचणीतील बळीराजाला दुष्काळी मदत मिळावी, यादृष्टीने आज (गुरुवारी) सकारात्मक निर्णय घेतला आहे.

मंगळवेढा, उत्तर सोलापूर, मोहोळला फटकाच

उत्तर सोलापुरातील तिऱ्हे, दक्षिण सोलापुरातील मंद्रूप, होटगी, निंबर्गी, विंचूर, अक्कलकोट तालुक्यातील किणी, जेऊर, तडवळ, करजगी, दुधनी, मैंदर्गी, मोहोळ तालुक्यातील कामती व वाघोली, पंढरपूर तालुक्यातील पंढरपूर, भंडीशेगाव, भाळवणी, करकंब, पटवर्धन कुरोली, पुळूज, तुंगत, कासेगावसह जिल्ह्यातील आणखी ४० महसूल मंडलांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे त्याठिकाणी आता दुष्काळ जाहीर होईल. मात्र, मंगळवेढा, मोहोळ व उत्तर सोलापूर या तीन तालुक्यांमधील बहुतेक महसूल मंडलांमध्ये पावसाळ्यात सरासरीच्या तुलनेत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याचे कृषी विभागाकडील आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळे त्याठिकाणी देखील दुष्काळ जाहीर करण्याची मागणी कायम राहणार आहे.

उर्वरित मंडलांसाठी सरकारकडे प्रस्ताव

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर व मोहोळ या सहा तालुक्यांमधील ४० महसूल मंडलांचा दुष्काळात समावेश झाल्याचे समजले. त्यात कोणकोणती मंडले आहेत हे पाहून उर्वरित मंडलांसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल.

- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT