drought esakal
महाराष्ट्र बातम्या

Drought : राज्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या वाढणार?

केंद्र सरकारच्या दुष्काळ संहितेच्या आधारे ४० तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - केंद्र सरकारच्या दुष्काळ संहितेच्या आधारे ४० तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले असले, तरी अनेक भागांतील शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. महसूल आणि पुनर्वसन विभागाने पुन्हा सर्वेक्षण हाती घेतले असून, राज्य सरकार मंडलनिहाय सर्वेक्षण करणार आहे.

यामध्ये ५०० पेक्षा अधिक मंडलांचा समावेश दुष्काळी भागात होण्याची शक्यता आहे. मात्र, नव्याने समावेश झालेल्या दुष्काळी भागाला केंद्र सरकार मदत करणार नसून, राज्य सरकारलाच दुष्काळ निवारणासाठी मदत करावी लागणार आहे.

राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठविण्यात आली. सत्ताधारी आमदार, खासदारांच्या जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर झाला, अशी टीका करण्यात आली. यामुळे मदत व पुनर्वसन विभागानेही एक पाऊल मागे घेत केंद्र सरकारच्या निकषांत दुष्काळ जाहीर करण्यास काही तालुके बसत नसतील तरी जिथे पाऊस कमी आहे, अशा तालुक्यांना दिलासा देण्यासाठी निकष निश्चित करून त्यांनाही दिलासा दिला जाईल, असे जाहीर केले आहे.

राज्यातील उर्वरित तालुक्यांतील मंडलांमध्ये असलेली पर्जन्यमानाची कमतरता विचारात घेण्यात येईल. आवश्यक ते निकष निश्चित होतील. या मंडलांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून, या मंडलांसाठी योग्य त्या सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देश मंत्रिमंडळाने दिले आहेत. त्यानुसार या उपसमितीच्या बैठकीत याबाबतचा योग्य तो निर्णय घ्यावा, असे आदेशही देण्यात आले आहेत.

नागपुरातील संस्थेकडून सर्वेक्षण

दुष्काळाबाबतच्या टीकेनंतर मदत व पुनर्वसन विभाग कामाला लागला आहे. कमी पर्जन्यमान झालेल्या जिल्ह्यांची पडताळणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत खुलासा करताना दुष्काळ जाहीर करताना सर्व निकष हे शास्त्रीय आधारावर आधारित असून, दुष्काळाचे सर्वेक्षण हे नागपूरमधील ‘महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर’मार्फत करण्यात आले असून, यामध्ये कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप नव्हता. २०१८ मध्येही याच निकषांवर दुष्काळ जाहीर केला होता, असे राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

Bihar CM: राजकारणात मोठी घडामोड! बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण? निर्णय आता शिवराज चौहान यांच्या हाती, भाजपचा गेमचेंजर प्लॅन तयार

Ambadas Danve News: रक्ताने माखलेला शर्ट, दानवेंनी वाचवला एका व्यक्तीचा जीव...

IPL 2026, LSG vs GT: प्रसिद्ध कृष्णाचा तिखट माऱ्याने लखनौची फलंदाजी गडबडली; गिलच्या गुजरातसमोर सोपं लक्ष्य

SCROLL FOR NEXT