Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

Iran US Tensions : या भागात व्यापारी जहाजांवर वाढत्या हल्ल्यांबाबत भारताने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. भारताने तणाव कमी करून आंतरराष्ट्रीय जलमार्ग सुरक्षित आणि मुक्त ठेवण्याची मागणी केली आहे.
10 Indian Crew Members Rescued, One Still Missing

10 Indian Crew Members Rescued, One Still Missing

esakal

Updated on

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, ओमानच्या किनाऱ्याजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याबाबत भारताने कठोर भूमिका घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. रविवारी जारी केलेल्या निवेदनात मंत्रालयाने माहिती दिली की, जहाजावरील ११ भारतीय नागरिकांपैकी १० जणांची सुटका करण्यात आली आहे, तर एक जण अद्याप बेपत्ता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com