drought in Solapur district is dark shade
drought in Solapur district is dark shade 
महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : पावसाळा सुरू होऊन तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला, तरी सोलापूर जिल्ह्यात 11 पैकी 10 तालुक्‍यांमध्ये 45 टक्‍क्‍यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात साधारणपणे रक्षाबंधनानंतर पाऊस येतो, असे सांगितले जात होते. मात्र, आज विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन झाले. पण, तोही पाऊस न आणता कोरडाच आला आहे. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद झाली आहे. 

सोलापूर जिल्ह्याची ओळख ही दुष्काळी जिल्हा अशी आहे. मात्र, गेल्या वर्षी सुरवातीलाच चांगला पाऊस झाल्याने त्याची जाणीव झाली नाही. त्यातच मागील दोन-तीन वर्षांत जलयुक्त शिवारची कामे चांगली झाल्यामुळे पाणीटंचाई जाणवली नाही. एकेकाळी 663 टॅंकरसंख्या असलेल्या जिल्ह्यात या तीन वर्षांत बोटावर मोजण्याइतकेच टॅंकर लागले. मात्र, यंदाच्या वर्षी पाऊसच नसल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. रब्बीचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याकडे पाहिले जाते. पण, यंदा पाऊसच नसल्याने रब्बी हंगामही वायाच जाणार,अशी स्थिती आहे. रक्षाबंधनानंतर पाऊस सुरू होतो,असे बोलले जाते. त्या वेळी तो न आल्यास पोळ्यापासून सुरू होईल, असे जाणकार सांगत होते. हे दोन्ही सण होऊन गेले आहेत; पण पाऊस काही आला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यात आजअखेर जेमतेम सरासरी 41.96 टक्केच पाऊस झाला आहे. 

जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण भरले असले, तरी या धरणाचा फायदा माळशिरस, पंढरपूर, माढा, मोहोळ या तालुक्‍यांनाच प्रामुख्याने होतो. उर्वरित तालुक्‍यांच्या काही भागात उजनीचे पाणी येते. मात्र, या तालुक्‍यांतील बऱ्याच भागात उजनीचे पाणी येत नसल्याने तेथील पिके जळून गेली आहेत. आता परतीचा पाऊस तरी कधी येणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. मागील 15 दिवसांपूर्वी काही ठिकाणी कृत्रिम पावसाचाही प्रयोग झाला; पण तो फारसा यशस्वी झाला नाही. 

पावसाची तालुकानिहाय सरासरी टक्केवारी 
उत्तर सोलापूर : 43.83, दक्षिण सोलापूर : 42.75, बार्शी : 68.31, अक्कलकोट : 39.48, मोहोळ : 44.84, माढा :34, करमाळा : 27.58, पंढरपूर : 41.63, सांगोला : 35.67, माळशिरस : 42.75, मंगळवेढा : 40.57, एकूण : 41.96 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT