महाराष्ट्र बातम्या

Lalit Patil Drugs Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील तपास प्रकरणातले अधिकारी बदलले; 'यांच्याकडे' असेल तपास

संतोष कानडे

पुणेः ससून रुग्णालयातील ड्रग्ज जप्ती प्रकरणातले तपास अधिकारी बदलण्यात आलेले आहेत. गुन्हे शाखेचे सुनील थोपटे हे या प्रकरणात तपास करत होते.

ससून परिसरात २ कोटी रुपयांचं ड्रग्ज सापडलं होतं. याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बारंबाकी इथून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

या ड्रग्ज प्रकरणातला मुख्य आरोपी ललित पाटील हा अद्याप फरार आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून ललित पाटील फरार झाला असून पोलिस यंत्रणेवर ताशेरे ओढले जात आहेत.

त्यातच एक महत्त्वाची अपडेट येत आहे. ललित पाटील प्रकरणातले तपास अधिकारी बदलले आहेत. प्रकरणाचा तपास सुनील थोपटे हे करीत होते. आता त्यांच्याऐवजी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील तांबे हे तपास करतील.

नाशिकमध्ये ड्रग्जचा कारखाना

ललित पाटील याला ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. येथे ९ महिने उपचार घेतल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. पोलिसांनी चौकशीदरम्यान ललितसह त्याचा भाऊ भूषण हे दोघे मिळून नाशिक इथं ड्रग्ज बनवण्याचा कारखाना चालवत असल्याचं समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT