pali dry fish 
महाराष्ट्र बातम्या

Dry Fish: सुक्या मासळीचे झाले अतोनात नुकसान; पंचनाम्यांना सुरुवात!

सकाळ डिजिटल टीम

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या हानीचे पंचनामे सुरू आहेत. आता कोळी युवाशक्ती संघटनेच्या पाठपुराव्याने तहसील कार्यालयातून वसईतील मच्छीमारांच्या सुक्या मासळीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू केली आहे.

आतापर्यंत दीडशेहून अधिक पंचनामे झाले आहेत. अजूनही ही प्रक्रिया सुरू आहे. पंचनामे झाल्यानंतर नुकसानभरपाईकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठवले जातील, असे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी सांगितले.

गेल्या रविवारी आणि सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे माध्यमांमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीची चर्चा सुरू होती. मुख्यमंत्र्यांनीही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना निर्गमित केल्या होत्या.

त्याच वेळी मत्स्यदुर्भीक्षामुळे मेटाकुटीस आलेल्या मच्छीमार समाजाकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष झाल्याची स्थिती होती. पाचूबंदर-किल्लाबंदर येथील कोळी युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी तहसीलदार अविनाश कोष्टी यांची भेट घेऊन सुक्या मासळीच्या हानीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

पाचूबंदर-किल्लाबंदर येथील किनारा बेकायदा रेतीउपशामुळे आधीच वाहून गेल्यामुळे गरीब कोळी महिलांचा मासळी सुकवण्याचा व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला आहे. मात्र आजही काही महिला मोठ्या कष्टाने मासळी वाळवण्यासाठी जेट्टी, चौथरे अशा ठिकाणी जेथे जागा मिळेल तेथे उन्हातान्हात मासळी सुकवतात व त्यावर आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील या महिलांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. सुकवण्यासाठी ठेवलेले बोंबील, मांदेली, वाकटी, बलवट इत्यादी प्रकारची मासळी अवकाळीमुळे खराब झाली. या महिलांना शासनाकडून मदतीचा आधार मिळणे गरजेचे आहे,

ही बाब कोळी युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष मिल्टन सौदिया यांच्यासह संजय मानकर, विशाल पाटील, ब्लेस जान्या यांनी वसई तहसीलदार यांची बुधवारी भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणली होती. तहसीलदार कोष्टी यांनी त्वरित मंडळ अधिकारी सुनील राठोड यांना याप्रकरणी प्रत्यक्ष किनाऱ्यावर जाऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्याचे तथा त्यानुसार पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Maharashtra : राज्यात २० जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट; कमी दाबाच्या क्षेत्राचा विदर्भावर परिणाम, पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार

Maratha Reservation: मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; १५ सप्टेंबरला मुंबईकडे कूच, १९ पासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

SCROLL FOR NEXT