student e sakal
महाराष्ट्र बातम्या

DTE and EBC Scheme : ‘डीटीई’ आणि ‘ईबीसी’ योजनेत साडेतीन लाख विद्यार्थी लाभापासून वंचित

गेल्या सहा वर्षांत शिक्षण घेणाऱ्या ‘डीटीई’ आणि ‘ईबीसी’ योजनेत लाखों विद्यार्थी अपात्र

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यातील तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांचे २०१८ ते २०२४ या गेल्या सहा वर्षांत शिक्षण घेणाऱ्या १६ लाख ९४ हजार ४४५ विद्यार्थ्यांपैकी तब्बल तीन लाख ६७ हजार ५३६ विद्यार्थी हे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (डीटीई) आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना (ईबीसी) योजनेसाठी अर्ज करूनही पात्र ठरू शकलेले नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी योजनांपासून वंचित राहिले आहेत.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माण आदी अनेक व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मागास, इतर मागास आदी घटकातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृह आणि शिक्षण शुल्कासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना (डीटीई) आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना (ईबीसी) योजना राबविल्या जातात. यात शिक्षण शुल्काच्या राजर्षी शाहू शिक्षण शुल्क योजनेतून दोन लाख ३९ हजार ९६९ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही.

दुसरीकडे डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासन निर्णयात विसंगती असल्याने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ९२ हजार ६३ अर्ज आलेले असताना तब्बल ५८ हजार ५०२ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नसल्याची माहिती विभागाच्या डीबीटी डॅशबोर्डच्या अहवालावरून समोर आल्याची माहिती दीपू फाउंडेशनच्या अमर एकाड यांना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT