Mumbai esakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपच्या मिशन मोडमुळे पालिकेत बदल्यांचे वारे 

आदित्य ठाकरेंच्या जवळच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरुच   

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात भाजपने नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात रणशिंग फुंकले आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावरच भाजप आक्रमक झाल्याचे एकीकडे पहायला मिळत आहे. तर भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेतही अधिकाऱ्यांची खांदेपालट सुरू झाली आहे. 

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रमाकांत बिरादर यांची बदली करून त्या खात्याचा भार परिमंडळ दोनचे उपायुक्त हर्षद काळे यांच्या हाती सोपवला आहे. तर काळे यांच्याकडील खात्यांची जबाबदारी रमाकांत बिरादर यांच्याकडे सोपवली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारची बदली केली जाऊ नये अशा प्रकारची प्रथा असतानाच महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी परिमंडळ दोनचे उपायुक्त व मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे समन्वय असलेल्या हर्षद काळे यांची बदली उपायुक्त( मध्यवर्ती खरेदी खाते) या पदावर केली आहे. तर रमाकांत बिरादर यांची बदली उपायुक्त (परिमंडळ २) मुंबई जिल्हा एड्स नियंत्रणा संस्थेच्या प्रकल्प संचालकपदी केली आहे.

आदित्य ठाकरेंच्या नजीकच्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या

आदित्य ठाकरे यांच्या नजीकच्या पालिकेतील अधिकाऱ्यांची प्रशासनाने शुक्रवारी बदली केली. त्यामध्ये सहाय्यक आयुक्तांची खांदेपालट झाली आहे. जी दक्षिणचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांची बदली डी वॉर्डमध्ये करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघाचा भाग असल्याने ते अतिशय नजीकच्या अधिकाऱ्यांपैकी एक असे अधिकारी होते.

तर डी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त असलेल्या प्रशांत गायकडवाड यांच्याकडे यापुढे मालमत्ता विभागाची जबाबदारी असणार आहे. तर संतोष कुमार धोंडे यांना जी दक्षिण विभागाची सहाय्यक आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर राजेश अक्रे यांना पी दक्षिणचे सहाय्यक आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. याआधीच आदित्य ठाकरे यांचे अतिशय जवळचे म्हणून मानले जाणाऱ्या किरण दिघावकर यांची दीड महिन्यात दोन वेळा बदली झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT