Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: पावसाळी अधिवेशनात विधान भवनात राष्ट्रवादीचीही असणार दोन कार्यालये

सकाळ डिजिटल टीम

नागपूर: अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत फुट पडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नागपूरच्या अधिवेशनाच्या काळात विधान भवनात शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन कार्यालये तयार करावी लागणार आहे.

एकनाथ शिंदेच्या माध्यमातून शिवसेनेत बंड झाले. शिंदे यांना शिवसेनेतील ४० आमदारांनी साथ दिली. नंतर त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. त्यांनी मुख्यमंत्री विराजमान झाले. त्यांच्या बंडाने शिवसेनत फुट पडली.

नंतर शिंदे गटाने आपलीच खरी शिवसेना असल्याचे सांगत धुनष्य बाणावरच दावा केला. विधान भवनातील कार्यालयावरून देखील मोठा वाद निर्माण झाला होता.

नागपुरातील पक्ष कार्यालयात प्रथम शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदारांनी प्रवेश केला होता. त्यांनी कार्यालयावत उद्धव व बाळासाहेब ठाकरे यांचे फोटोही लावले होते. परंतु त्यानंतर हे कार्यालय शिंदे गटाला देण्यात आले.

त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांसाठी दुसरे कार्यालय द्यावे लागले. या कार्यालयाला देखील शिवसेनाच नाव होते. आता अजित पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत फुट पडली आहे.

त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर काही आमदार शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीत आहे.

अधिवेशनात दोन कार्यालये आमने-सामने

या महिन्यात पावसाळी अधिवेशन मुंबईत असून सर्व परिस्थिती योग्य राहिल्यास हिवाळी अधिवेशन नागपुरात होईल.

या दोन्ही अधिवेशनात अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील किंवा शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी पक्षासाठी वेगळे पक्ष कार्यालय द्यावे लागणार आहे. त्यामुळे अधिवेशनात राष्ट्रवादीची दोन पक्ष कार्यालये दिसून येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT