Manoj Jarange Patil  
महाराष्ट्र बातम्या

Maratha Andolan : नडले अन् लढले! 'या' कारणांमुळे मनोज जरांगे पाटील ठरले मराठा आंदोलनाचे 'हिरो'

Komal Jadhav (कोमल जाधव)

राज्याचे राजकारण मागील काही दिवसांमध्ये अशा काही पद्धतीने बदललं त्यामुळे या बदललेल्या स्थितीत मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येईल असं कुणालाही वाटलं नव्हतं... अर्थात मराठा संघटनांमध्ये आघाडीवर राहून काम करणारे पदाधिकारी देखील असे काम करू लागले जणू काही मराठा आरक्षणाचं काहीच होणार नाही असंही अनेकांना वाटू लागलं. मात्र त्याच वेळी मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं. त्यांच्या उपोषणामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकार अक्षरश: हतबल झाल्याचं दिसून येतंय.

सरकारने आतापर्यंत दोन-तीनवेळा तातडीने जीआर काढूनदेखील जरांगे पाटील उपोषणावर ठाम असल्याने सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. आजपर्यंतच्या आंदोलनात सलग १५ दिवस चाललेलं आणि सरकारला जेरीस आणणारं जरांगे पाटील यांचं आंदोलन यशस्वी होताना दिसतंय.

जालन्यातल्या मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. आतापर्यंत तीनदा सरकारनं जीआर काढले, मनधरणीचे अनेक प्रयत्न केले तरी, जरांगे पाटील उपोषणावर ठाम राहिले. जरांगेंच्या आंदोलनाला यश मिळण्यामागे ५ कारणं आहेत.

त्यातील पहिलं कारण म्हणजे–

वन मॅन आर्मी आंदोलन

कसंय ना, आतापर्यंत आंदोलन किंवा मराठा आरक्षणासाठी एक समूह उपोषण करायचा. त्यातही सत्ताधाऱ्यांकडून मनधरणी केली, आमिषं दिली तर त्यातील काहीजण आंदोलनातून माघार घ्यायचे... पण, मनोज जरांगे पाटील एकटेच उपोषणाला बसल्यानं सरकार जोपर्यंत आपली मागणी मान्य करत नाही, तोपर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही, या भूमिकेवर ते ठाम आहेत. त्यामुळे इथे मतभेदांना संधी मिळत नाही आणि उपोषणाचा जो मुख्य विषय आहे, त्यातूनही ते बाजूला होत नाही.

मराठा समाजाचा सर्वसामान्य चेहरा

मराठा समाजाचा हा सर्वसामान्य चेहरा म्हणून मनोज जरांगे पाटलांकडे पाहिलं जातं. कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा न ठेवता आंदोलन करण्याचा पिंड आहे. मराठा समाजासाठी शिवबा संघटनेची स्थापना करत त्यांनी आरक्षणासाठी याआधीही अनेकदा आंदोलनं केली. सरकारनं दिलेल्या आश्वासनांमुळे ती आंदोलनं मुदतीत नियंत्रणात आली. पण यंदाचं आंदोलन पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर चिघळलं आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या मूळ मुद्द्याला घातला

मराठ्यांना आरक्षणासाठी सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यात अडचणी आहेत, असे अनेक आयोगांच्या अहवालातून स्पष्टही झालंय. शिवाय, राज्य मागासवर्ग आय़ोगानंही तोच उल्लेख केलाय. त्यामुळे ओबीसी कोट्यात समावेश झाल्याशिवाय मराठा आरक्षणाचा मार्ग नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आता ओबीसीतून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रं देत सरसकट आरक्षण देण्यात यावं, ही मागणी मनोज जरांगे पाटलांनी लावून धरलीय आणि मराठा, कुणबी, कुणबी-मराठा या मूळ मुद्द्यालाच त्यांनी हात घातलाय. या मागणीला मराठा समाजातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

पोलिसांच्या लाठीचार्जने आंदोलन गाजलं

जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे उपोषणाला बसले. याआधी केलेल्या आंदोलनांमुळे प्रशासनालाही त्यांच्या आंदोलनाची माहिती नक्कीच होती. अशातच त्यांची प्रकृती खालावू नये आणि तपासणीसाठी आलेल्या पोलीस पथकासोबत वाद झाला आणि पुढे याचं रुपांतर राड्यात झालं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांसह उपोषणस्थळी असलेल्या महिलांवर, तरुणांवर केलेल्या लाठीचार्जचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, संभाजी भिडेंनी या सर्वांनी मनोज जरांगेंची आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली आणि पुढे या आंदोलनानं मोठं रुप घेतलं.

तीन विचारांच्या सरकारमुळे आंदोलन चिघळलं?

आता राज्यात शिवसेना-भाजपा आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचं सरकार सत्तेत आहे. अशातच मराठा आरक्षणच काय, पण कुठल्याही मुद्द्यावर भूमिका घेण्यासाठी आधी या तीनही सत्तेतील पक्षांना विचारांनी एक व्हावं लागेल. त्यातच गृहमंत्री फडणवीस आहेत आणि त्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. त्यामुळे विरोधकांनी फडणवीसांनाही चांगलंच धारेवर धरलेलं दिसलं. त्यामुळे सध्याचं तीन विचाराचं सरकारमुळे जालन्यातील आंदोलन चिघळल्याचा आरोप होतोय.

पण, एक नक्की आहे... १५ दिवस झाले, तरी मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी ठाम आहेत. त्यामुळे एक अकेला सेकडोंपे भारी म्हणतात तसं, मनोज जरांगे एकटे आंदोलन करताहेत आणि त्यांच्या आंदोलनाला यशही येताना दिसतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT