ajit pawar devendra fadnavis 
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: विखेंमुळे निलेश लंके मविआत गेले; अजित पवारांनी स्वत:च सांगितल्याने महायुतीत भडका

Ajit Pawar On Nilesh lanke: महायुतीमध्ये खटके उडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांसारख्या नेत्यानं असं बोलणं योग्य नाही असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

कार्तिक पुजारी

मुंबई- विखे पालटांनी निलेश लंके यांना खूप त्रास दिला. त्यामुळेच निलेश लंके हे महाविकास आघाडीसोबत गेले असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक बैठकीमध्ये केलं होतं. यावरून महायुतीमध्ये खटके उडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांसारख्या नेत्यानं असं बोलणं योग्य नाही असं भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

अजित पवारांनी आचारसंहिता पाळावी. जेणेकरून महायुतीवर परिणाम होणार नाही. अशी उणी-धुणी काढायचं म्हटलं तर आम्ही देखील ते काढू. मला वाटतं अजित पवारांसारख्या नेत्याने अशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल तर ते योग्य नाही. शिवाजीराव आढळराव पाटील भाजपकडून लढले असते तर आम्ही जिंकलो असतो, असं आम्ही म्हणू शकतो, असं दरेकर म्हणाले.

यासंदर्भात जेव्हा महायुतीमध्ये मेळावा झाला. त्यावेळी सोनाराने कान टोचले आहेत. नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलंय की, अशा प्रकारचे वक्तव्य कोणी करू नये. जर कोणाला खुमखुमीच असेल तर त्याने वरिष्ठांशी बोलावं आणि आपली खुमखुमी मिटवावी, असं देखील दरेकर म्हणाले आहेत.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी निलेश लंके हे महायुतीकडून लढवण्यासाठी तयार होते. पण, नगरची जागा महायुतीकडे असल्याने आम्हाला ती देता आली नाही. दक्षिण नगर आणि माढा या लोकसभा जागांबाबत आम्ही महायुतीत विचारणा केली होती. दक्षिण नगरमधून निलेश लंके आणि माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढणार होते. पण, भाजपने दक्षिण नगर आणि माढ्याची जागा आमच्यासाठी सोडली नाही, असं अजित पवार म्हणाले.

निलेश लंकेंनी पारनेर विधानसभेसाठी पत्नीच्या उमेदवारीसाठी सुद्धा आग्रह धरला होता. पालकमंत्री विखे पाटलांनी खूप त्रास दिल्याने निलेश लंके महाविकास आघाडीकडे गेले. निलेश लंके यांच्या मित्रांच्या खडी क्रॅशर कंपन्यांना मोठ्या प्रमाणात टॅक्स लावण्यात आला. विखेंनी त्रास दिल्याने लंकेंनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला, असं अजित पवार अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Deshmukh Murder Case: कोण होते पंडित कमलाकर देशमुख, कशी झाली होती हत्या? सोलापूर हादरवणारी Exclusive माहिती

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

Credit Card Offer: लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड ऑफर! कमी क्रेडिट स्कोअर असला तरीही चालेल! काय आहे ही नवी ऑफर?

Latest Marathi News Live Update : कृषिमंत्री दत्तामामा भरणे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आजारी पत्नीवर जादूटोणा करण्याचा प्रकार उघड! 'शेतात चाललं होतं भयानक कांड'; संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना समोर..

SCROLL FOR NEXT