solapur accident
solapur
सोलापूर : कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथील वत्सलाबाई मुनाळे प्रशालेजवळ सोमवारी (ता. ८) भरधाव डंपरने (एमएच २० डीई ४२६६) दुचाकीला धडक दिल्याने धोंडप्पा जोडमोटे (वय ७०, रा. कारंबा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार मल्लिनाथ हिप्परगी (वय ६०) हे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी डंपर पेटवून दिला.
सोमवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास धोंडप्पा जोडमोटे हे नेहमीप्रमाणे कारंबा-नान्नज रस्त्यावरील आपल्या शेताकडे जात होते. गावातील मल्लिनाथ हिप्परगी यांनी त्यांना पाहून दुचाकीवरून शेतात सोडण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार दोघे शेताकडे निघाले. त्याचवेळी विटा घेऊन एक डंपर गुळवंचीहून नान्नजकडे जात होता.
शेताजवळ आल्यानंतर मल्लिनाथ हिप्परगी यांनी दुचाकी वळविली. त्याचवेळी मागून येणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी डंपरखाली अडकली आणि दोघेही काही अंतर फरफटत गेले. या भीषण अपघातात धोंडप्पा जोडमोटे यांचा जागीच मृत्यू झाला, तर मल्लिनाथ हिप्परगी गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त झालेल्या काही ग्रामस्थांनी अपघातग्रस्त डंपर पेटवून दिला. अपघातानंतर चालक पसार झाला होता. माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण करून डंपरची आग आटोक्यात आणली.
जखमी मल्लिनाथ हिप्परगी यांना मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेतून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिस डंपर चालक व मालकाचा शोध घेत आहेत. संबंधित डंपर गुळवंची येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, धोंडप्पा जोडमोटे यांच्या मृतदेहाची शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास कारंबा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व अन्य नातेवाईक असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.