Special Railway esakal
महाराष्ट्र बातम्या

Railway : उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांचा कालावधी वाढविला!

रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पावसाळ्यात ही उन्हाळी विशेष गाड्याचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पावसाळ्यात ही उन्हाळी विशेष गाड्याचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस -छपरा दरम्यान उन्हाळी विशेष गाड्याचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईतून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०५०६३ छपरा-एलटीटी उन्हाळी विशेष गाडी ७ जुलै २०२३ पासून छपरा स्थानकांवरून आणि ट्रेन क्रमांक ०५०६४ एलटीटी-छपरा उन्हाळी विशेष गाडी ९ जुलै २०२३ पासून लोकमान्य टिळक टर्मिनसवरून मुदत वाढ देण्यात आली आहे.

या दोन्ही उन्हाळी विशेष गाड्यांचा वेळापत्रकात आणि संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या गाड्याचे आरक्षण मंगळवारपासून रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेस्थळावर सुरू झाले आहे. विशेष म्हणजे प्रवाशांच्या गर्दी लक्षात घेऊन आणि प्रवाशांच्या मागणीनुसार उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांची मुदतवाढ करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Impact: पेट्रोल-डिझेल महागलं… आता होम लोन आणि EMI वरही बसणार मोठा फटका!

IAS पद्मा जयस्वाल कोण? २३ वर्षे सेवेनंतर बडतर्फ, राष्ट्रपतींनी कारवाईला दिली मंजुरी

MI च्या इतिहासातील एक पर्व संपलं! १६ वर्षांपासून संघासोबत असलेल्या दिग्गजाने, MI ला ठोकला रामराम

Gold Rate Today: सोन्या-चांदीत मोठी घसरण! सोनं 11 हजार तर चांदी 30 हजारांनी स्वस्त; काय आहे ताजा भाव?

२-३ वर्षे तयारी, लाखो रुपये खर्च; पेपरफुटीने NEET परीक्षा रद्द, ३ विद्यार्थ्यांनी संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT