MVA Cabinet 
महाराष्ट्र बातम्या

कोरोना काळात महाविकास आघाडीच्या १८ मंत्र्यांवर सरकारी तिजोरीतून उपचार

कोट्यवधी रुपयांची बिलं सरकारी तिजोरीतून भरण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : कोरोनावरील उपचारांसाठी महाविकास आघाडीच्या १८ मंत्र्यांची सरकारी तिजोरीतून बिलं भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वाधिक मंत्र्यांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा एकूण खर्च हा कोट्यवधी रुपयांचा आहे. झी २४ तासनं याबाबत वृत्त दिलं आहे. (During Corona period 18 ministers of MVA received treatment from govt teasury)

महाराष्ट्रात कोरोना महामारीचं भयानक संकट असताना तसेच जनता या काळात रुग्णालयातील बेडसाठी धडपड करत असताना मंत्र्यांनी मात्र खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले आहेत. विशेष म्हणजे या लाखो रुपयांच्या खर्चाची बिलं सरकारी तिजोरीतून भरण्यात आली आहेत. गेल्या दोन मंत्र्यांनी हे उपचार घेतले आहेत. या सर्व मंत्र्यांचा एकूण खर्च हा १ कोटी ३९ लाख रुपये इतका झाला आहे. या उपचार घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक ९, काँग्रेसचे ६ तर शिवसेनेच्या ३ मंत्र्यांचा समावेश आहे.

कोणत्या मंत्र्यांचा समावेश आणि किती झाला खर्च?

राजेश टोपे (राष्ट्रवादी) - ३४ लाख

नितीन राऊत (काँग्रेस) - १८ लाख

हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) - १४ लाख

अब्दुल सत्तार (शिवसेना) - १२ लाख

जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) - १२ लाख

छगन भुजबळ (राष्ट्रवादी) - ९ लाख

सुनील केदार (काँग्रेस) - ९ लाख

जयंत पाटील (राष्ट्रवादी) - ७ लाख

सुभाष देसाई (शिवसेना) - ७ लाख

अनिल परब (शिवसेना) - ७ लाख

कोणत्या आठ रुग्णालयांमध्ये घेतले उपचार?

बॉम्बे हॉस्पिटल - ४१ लाख

लिलावती हॉस्पिटल - २६ लाख

ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल - १५ लाख

जसलोक हॉस्पिटल - १४ लाख

फोर्टिस हॉस्पटल - १२ लाख

अवंती हॉस्पिटल - ७ लाख

ग्लोबल हॉस्पिटल - ४ लाख

अनिदीप हॉस्पिटल - २ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT