Kirit Somaiya esakal
महाराष्ट्र बातम्या

Dussehra 2021 : किरीट सोमय्यांच्या 'रावणा'वर पोलिसांची धडक कारवाई

सकाळ डिजिटल टीम

भाजपनं दसऱ्यानिमित्त महाविकास आघाडी सरकारच्या घोटाळ्यांचं दहन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

मुंबई : भाजपनं दसऱ्यानिमित्त महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) घोटाळ्यांचं दहन करण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मविआ सरकार आणि विशेषतः अजित पवारांच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत सातत्यानं पाठपुरावा करणारे भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र, मुलूंडमध्ये किरीट सोमय्या यांनी उभारलेला 'भ्रष्टाचाररुपी रावण' पोलिसांनी हटवला असून संबंधितांवर कारवाई सुरु केलीय. दरम्यान, भाजप नेते सोमय्या आणि पोलिसांत कारवाईवेळी बाचाबाची झाल्याची माहिती मिळतेय.

महाराष्ट्रातील घोटाळेबाज सरकारचा निषेध करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन भाजपकडून करण्यात आलं होतं. भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारविरुद्ध आवाज उठवला जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी करताना गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेते सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर अजित पवार यांची आणि त्यांच्याशी संबंधित सर्वांची आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. गेल्या सलग सात दिवसांपासून अजित पवारांशी संबंधित अनेकांच्या कार्यालयांवर धाडी पडत असून आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय.

आज मुलूंडमध्ये सोमय्या यांनी उभारलेल्या 'भ्रष्टाचाररुपी रावण'चं भाजपकडून दहन करण्यात येणार होतं. मात्र, या कार्यक्रमाबद्दल सोमय्यांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे कारण देत पोलीस व पालिकेनं मुलूंडमधील 'भ्रष्टाचाररुपी रावणा'चं पोस्टर हटवलंय. सोमय्या यांनी राज्य सरकारविरोधात हे पोस्टर उभारलं होतं. मात्र, कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी ही कारवाई केलीय. दरम्यान, कारवाईवेळी सोमय्या आणि पोलिसांत बाचाबाची पहायला मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात कंपनीतून पैशांची पोती घेऊन पळाला... घराखाली ड्रममध्ये पुरले कोट्यवधी रुपये, पोलिसांना कसा लागला सुगावा?

Maharashtra Weather: ‘अर्णव’च्या मार्गात पश्चिमेकडील वारे; चक्रीवादळ किनारपट्टीवर रेंगाळल्याने राज्याला लाभ नाही

नागपुरात भाजपला धक्का! पदवीधर निवडणुकीत नाट्यमय घडामोडी, काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी

IND vs NZ: भारताविरुद्ध आधी मालिका गमावली अन् आता न्यूझीलंडचे दोन प्रमुख गोलंदाज शेवटच्या T20I सामन्यांमधून बाहेर, कारण काय?

Gokul Dairy Employees : नेत्यांसाठी कायपण! 'गोकुळ' निवडणुकीत ताळतंत्र सोडलं; कामावर दांडी मारून प्रचारात फिरणाऱ्या 350 कर्मचाऱ्यांना पाठवल्या नोटिसा, प्रशासकांचा दणका

SCROLL FOR NEXT