Dussehra Melava esakal
महाराष्ट्र बातम्या

Dussehra Melava: 'ठाकरी बाणा' की, 'शिंदेशाही'? 'यावर' ठरणार मेळाव्यांचं यश

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बंड करून मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांच्यात आज प्रथमच थेट शाब्दिक सामना होणार आहे. मुंबईत आयोजित दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून राज्यभरातून शिवसैनिक आणि शिंदे समर्थक मुंबईत दाखल झाले आहे. अर्थात आजचा सामना नेतृत्वविरुद्ध बंड असाच होणार आहे. हे निश्चित आहे.

दोन्ही गटांनी तयारी जय्यत केली असली, तरी मेळाव्याचे यश अखेर भाषणांवरच ठरणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणामुळे कधीकाळी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठायचा. त्यानंतर शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आले. आता उद्धव ठाकरे देखील ठाकरी बाण्याने भाषण करताना दिसतात. नुकत्याच झालेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव यांनी भाषण केले होते. त्यामुळे शिवसेनेचा आक्रमक बाणा दिसून आला होता. ठाकरे कुटुंबातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी तर लाखोंची गर्दी होते.

राज यांच्या भाषणाची लोकप्रियता प्रचंड आहे. एकूणच ठाकरे कुटुंबाच्या भाषण शैलीची लोकप्रियता महाराष्ट्रात पूर्वीपासूनच आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान तडफदार भाषण करण्याचं असणार आहे. अर्थात शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर नेतृत्वाचं भाषण करावं लागणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापनेच्या वेळी सभागृहात केलेलं भाषण चांगलेच गाजले होते. शिंदे यांनी अनेक गोष्टींचा खुलासा करत सभागृहात वाहवाही मिळावली होती. त्यामुळे शिंदे यांच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. अर्थात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या मेळाव्याचं यश संपूर्णपणे भाषणावरच ठरणार हे स्पष्टच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT