Duststorm sakal
महाराष्ट्र बातम्या

धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रामार्गे रविवारी पोचले राज्यात

पुणे शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. त्यामुळे किमान तापमानात ही वाढ होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. त्यामुळे किमान तापमानात ही वाढ होत आहे.

पुणे - पाकिस्तानच्या (Pakistan) दिशेतून येणारे धुळीचे वादळ (Dust Storm) गुजरात, अरबी समुद्रामार्गे रविवारी राज्यात (Maharashtra) पोचले. पुणे, मुंबईसह उत्तर कोकणात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरणासह (Environment) धुळीचा वादळाचे सावट होते. त्यामुळे दृष्यमानता कमी झाली होती. धुळीच्या वादळामुळे पुण्यासह मुंबई येथे धुलीकणांचे (Dust) प्रमाण वाढल्याची नोंद भारतीय उष्णकटीबंधिय हवामानशास्त्र संस्थेच्या (आयआयटीएम) ‘सफर’ या संकेतस्थळावर झाली.

शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. त्यामुळे किमान तापमानात ही वाढ होत आहे. मात्र कमाल तापमानातील घट आणि वाऱ्यांच्या प्रवाहामुळे दिवसा गारठा जाणवत होता. रविवारी शहरात १७.२ अंश सेल्सिअस किमान तर २५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंदले गेले. तसेच धुळीचा वादळाच्या प्रभावामुळे हवेतील धुलीकणांमध्ये ही वाढ झाली होती. राज्यात या पूर्वी २०१५ आणि २०१२ मध्ये अशा प्रकारचा धुळीचे वादळ आले होते.

रविवारच्या हवामानाबाबत -

- शहर व परिसरातील काही ठिकाणी धुळीच्या वादळामुळे दृष्यमानता कमी

- २० ते २५ किलोमीटर ताशी इतक्या वेगाने वारे वाहत होते

- वाऱ्यांचा प्रवाह पश्‍चिमेच्या दिशेने पूर्वेकडे

- पुण्यात अतिसूक्ष्म धुलीकण (पीएम २.५) आणि सूक्ष्म धुलीकणाचे (पीएम १०) प्रमाण साधारण १०० प्रति घनमीटर इतके

असे निर्माण होतात धुळीचे वादळ

वाळवंटी परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यास तेथून धूळ उंचावर उडते आणि ही धूळ पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमध्ये मिसळते. त्यामुळे वाऱ्यांच्या प्रवाहाबरोबर धुळ कित्येक किलोमीटरचा प्रवास करतात आणि धुळीचे वादळ निर्माण होते. साधारणपणे अशी वादळे देशात उत्तरेकडील काही राज्यांपर्यंत प्रवास करतात. महाराष्ट्रात धुळीच्या वादळांचे प्रमाण कमी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT