Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

दोन वर्षांत इंदू मिलमधील स्मारक पूर्ण होणार : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास या महिन्यात काम सुरु होणार असून, यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याच महिन्यात देण्यात येतील. 14 एप्रिल 2022 पर्यंत दोन वर्षांत या स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

आज (गुरुवार) सकाळी अजित पवार यांनी इंदू मिल येथे जाऊन पाहणी केली. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या कामाची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत याविषयी माहिती दिली. 

अजित पवार म्हणाले, की जनतेने आम्हाला संधी दिली आहे. हे भव्य स्मारक व्हावे म्हणून मी पाहणीसाठी आलो. माझ्या कारकिर्दीत मी अनेक इमारती उभ्या केल्या आहेत आणि लक्ष घातलं आहे. त्याप्रमाणे ही इमारत भव्यदिव्य व्हावी असे वाटते. काही परवानग्या हव्या असतील तर त्या राज्य सरकारच्या अखत्यारित असतील त्यामुळे अडचणी येणार नाहीत. पुन्हा एकदा कॅबिनेट समोर जावा लागेल त्याला कॅबिनेट परवानगी देईल. जेवढा पैसा लागेल तेवढा राज्य सरकार देईल. रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये चार लाख पाणी साठेल, पण त्याची पातळी वाढावा म्हणून सांगितलं आहे. आज पोलिसांच्या घरासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना बोलावलं आहे.

पवार कुटुंबीय अंधश्रद्धा पाळत नाही
पवार कुटुंबीय अंधश्रद्धा पाळत नाही. तशी आम्ही शपथ घेतली आहे, त्यामुळे तो प्रश्न नाही. मंत्रालयातील 602 केबिन मी नाकारलेली नाही. केबिन घेतला कोणालाही त्रास दिलेला नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party : कॉक्रोच जनता पार्टीचे सोशल मीडिया अकाउंट्स हॅक; डिजिटल हल्ल्याने खळबळ, समर्थक आक्रमक!

Green Card Rules Changes : डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा भारतीयांना मोठा धक्का; ग्रीन कार्डसाठीचे नियम बदलले, आता मायदेशी परतावं लागणार...

Marathi Live News update: अकरावी प्रवेश प्रक्रियेचा फज्जा, दुसऱ्या दिवशीही गोंधळ

Konkan Heritage: कोदवली येथे तीन मराठाकालीन शिलालेख; फेब्रुवारी १८४५ मध्ये झाला श्री शंकरेश्वराचा जीर्णोद्धार, बंदर प्रशासनाचा इतिहास

Beed Encroachment: कचऱ्यात फेकली आजीची भाजी; अतिक्रमणविरोधी कारवाई, बीडमध्ये भाजीविक्रेत्या वृद्धेला अश्रू अनावर..

SCROLL FOR NEXT