Earthquake sakal
महाराष्ट्र बातम्या

Earthquake: राज्यात झालेल्या भूकंपाचा हा तालुका आहे केंद्रबिंदू, मोठी अपडेट आली समोर

Earthquake In Marathwada: अनेक वेळा पुर्ण हिंगोली जिल्ह्याला भुकंपाचे धक्के लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Earthquake in maharashtra : बुधवारी ता.१० सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी वसमत तालुक्यात भुगर्भातून मोठा आवाज आल्यानंतर भुकंपाचा धक्का जाणवला. जमीन हादरल्याने नागरीक भयभीत होऊन घराबाहेर पडले. या भुकंपाचा केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यात असून यांची नोंद ४.० रिस्टर स्केल असल्याची माहिती तहसिलदार शारदा दळवी यांनी दिली.

वसमत तालुक्यात खास करुन पांगरा शिंदे परिसरात नेहमीच जमीनीतूनगुढ आवाज येऊन भुकंपाचे सौम्य धक्के जाणवतात. मात्र याबाबत प्रशासनाकडून कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. यानंतर अनेक वेळा पुर्ण हिंगोली जिल्ह्याला भुकंपाचे धक्के लागल्याच्या घटना घडल्या आहेत.

बुधवारी सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी अचानक भुगर्भातून मोठा आवाज झाला. त्याऩतर काही सेकंद जमीन अक्षरशः हादरली. अचानक आलेला आवाज आणि जमिन हादरल्याने नागरीक भयभीत होऊन घराबाहेर पडले.

पुन्हा भुकंपाचा धक्का लागू शकतो म्हणून तासभर नागरीक घराबाहेर राहिले. दरम्यान याबाबत तहसिलदार शारदा दळवी यांना विचारले असता सदरील भुकंपाचा केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यात असून वसमत तालुक्याला त्याचे सौम्य धक्के बसले असून रिस्टर स्केल मध्ये भुकंपाची नोंद ४.० एवढी असल्याचे म्हणाले. भुकंपामुळे तालुक्यात जिवित किंवा वित्त हाणी झाली नसल्याची प्रथमदर्शी माहिती असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT