महाराष्ट्र बातम्या

सोलापूर विद्यापीठात भूकंपाची यंत्रणा! पुणे, नगर, उस्मानाबाद, कोल्हापूर, लातूरची मिटली चिंता

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भुकंपाची 15 दिवस अगोदर पूर्वसूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मुंबईच्या भाभा परमाणु अनुसंधान केंद्राकडून ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याचा लाभ सोलापूर, नगर, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, पुण्यासह 500 किलोमीटर अंतरावरील जिल्ह्यांना होणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये भुकंपाची 15 दिवस अगोदर पूर्वसूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मुंबईच्या भाभा परमाणु अनुसंधान केंद्राकडून ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याचा लाभ सोलापूर, नगर, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, पुण्यासह 500 किलोमीटर अंतरावरील जिल्ह्यांना होणार आहे.

'रेडॉन जिओ स्टेशन' असे या केंद्राचे नाव असून विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण पार पडले. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील, विद्यापीठातील भूगर्भ विषयाचे प्रा. डॉ. धवल कुलकर्णी, डॉ. अंजना लावंड, डॉ. माया पाटील, प्रा. योगेश दुरुगवार, डॉ. विनायक धुळप, डॉ. एस. पी. बाविस्कर आदी उपस्थित होते. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि भाभा परमाणु अनुसंधान केंद्र, मुंबई यांच्यात यापूर्वीच सामंजस्य करार झाला आहे. त्यामुळे संशोधनासाठी आणि परिसरातील भूकंपासंदर्भातील माहिती लोकांना मिळावी म्हणून ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. जमिनीत तीन फूट खोलपर्यंत हे उपकरण स्वतः बाबा अनुसंधान केंद्राच्या वतीने बसविण्यात आले आहे. त्याची संपूर्ण यंत्रणा सौर ऊर्जेवर चालते. रेडॉन गॅस हा रेडिओ ऍक्‍टिव्ह सामग्रीचे बाय प्रॉडक्‍ट आहे. भूकंपाच्या हालचाली जमिनीत सुरू झाल्यानंतर हे उपकरण रेडॉनचे उत्सर्जन मोजते. त्यामुळे भूकंपपूर्व क्रिया होण्यापूर्वी पाण्याच्या झऱ्यात रेडॉनचे प्रमाण वाढल्याचे आधीच समजते. हे उपकरण रेडॉन शोधून काढून संबंधित यंत्रणेला सिग्नल पाठवते. अनेकदा भूकंप होणार असल्याची काहीही पूर्वकल्पना नसल्याने मोठ्या प्रमाणावर वित्त व मनुष्यहानी झाली आहे. पण, या यंत्रणेमुळे भूकंप होण्यापूर्वी जमिनीत हालचाली सुरू झाल्याबरोबर त्याची माहिती यंत्रणेकडून मिळते आणि पुढील मनुष्य व वित्तहानी टळण्यास मदत होईल, असा विश्‍वास भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. धवल कुलकर्णी यांनी व्यक्‍त केला.

संशोधनाला मोठी संधी
विद्यापीठातील रेडॉन जिओ स्टेशनमुळे विद्यार्थी व अभ्यासकांना नवे संशोधन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्याचा फायदा विद्यार्थी व अभ्यासकांनी घ्यावा. या उपक्रमामुळे भुकंपाची पूर्वसूचना मिळेल आणि त्यातून लोकांना सतर्क राहता येईल, असे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT