Kirit-Somaiya sakal
महाराष्ट्र बातम्या

INS Vikrant : आर्थिक गुन्हे शाखेकडून सोमय्यांना नोटीस

मुंबई आर्थिक गुन्हे शाखेची टिम सोमय्यांच्या घरी पोहोचली

सकाळ डिजिटल टीम

INS Vikrant च्या निधी घोटाळ्याप्रकरणी भाजपाचे नेते सोमय्यांच्या अडचणीमध्ये वाढ झालीय. कारण आर्थिक गुन्हे शाखेकडून सोमय्यांना नोटीस बजाण्यात आलीय. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेची टिम सोमय्यांच्या मुंलूंडमधील कार्यालयात पोहोचलीय. उद्या आर्थिक गुन्हे शाखेत चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावला जाणार असल्याची माहीती समोर येतेय. विक्रांत निधी अपहार प्रकरणी जामीन नाकारल्यानंतर सोमय्या नॉट रिचेबल आहेत. मुंबई पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. तर या प्रकरणाचा तपास करणाऱ्या इकोनॉमिक ओफेन्स विंग देखील सोमय्यांच्या मागावर आहेत. किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना ही नोटीस बजावण्यात आली. उद्या जर सोमय्या हजर राहिले नाही तर मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय.

१३ तारखेनंतर पोलिसांसमोर हजर राहण्याविषयी किरीट सोमय्यांनी सांगितलं होतं. मात्र जर सोमय्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात उद्या पोहोचले तर मुंबई पोलिस त्यांना अटक करु शकतात. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी, सोमय्यांनी जर काही गुन्हा केला नाही तर ते का हजर होत नाही असा प्रश्न उपस्थित केलाय. तर भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांनी सोमय्या धाडसी नेते असून १०० टक्के चौकशीला उपस्थित राहतील असं एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितलं, संजय राऊतांनी गृहमंत्र्यावर दबाव टाकत कारवाई करण्यास भाग पाडल्याचा आरेप त्यांनी केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपने राष्ट्रीय पातळीवर केली नियुक्ती, सोपवण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

Fifa World Cup विजेत्या देशाचा क्रिकेटच्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाच्या महासत्तेला धक्का; स्पेनचा २१-० हा विक्रम नेमका आहे तरी काय?

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Marathi News Live Updates : वाराणसी विमानतळावर विमानातील प्रवाशाकडे आढळले शस्त्र

घरी नणंदेसोबत कशी वागते करीना कपूर? सैफ अली खानच्या बहिणीने सांगितली आतली गोष्ट; म्हणाली- ती नाटकी...

SCROLL FOR NEXT