ED Action against NCP leader Praful Patel 
महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रवादीला मोठा धक्का! ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली असून त्यांची संपत्ती जप्त करण्यातआली आहे. याआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नवाब मलिक आणि आता प्रफुल पटेल यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. ईडीची कारवाई होणार पटेल तिसरे नेते ठरणार आहे. (ED Action against NCP leader Praful Patel)

इक्बाल मिर्ची प्रकरणी इडीकडून ही करावाई झाल्याचे सांगितले जात आहे. वरळी येथील प्लॉट खेरदी प्रकरणी मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप हा प्रफुल्ल पटेल यांच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान ईडीने केलेल्या या कारवाईत पटेल यांच्या वरळी येथील घर जप्त करण्यात आले आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणात मागील काही दिवसांपासून चौकशी करण्यात आली आहे.

पटेल यांचं घर असलेली बिल्डींग DHFL कडून डेव्हलप करण्यात आले होते. दरम्यान पटेल आणि त्यांचं कुटुंब हे प्लॅट सध्या वापरू शकणार आहेत मात्र त्यांची विक्री ईडीच्या परवानगीशिवाय त्यांना करता येणार नाही. इक्बाल मिर्ची याने हा प्लॅट खरेदी केला होता, आणि त्यानंतर हा एका डेव्हलपरने हा प्लॅट डेव्हलप केल्यानंतर यातले काही फ्लॅट पटेल यांना विकले. या व्यवहारात मनी लाँड्रीग करण्यात आल्याचा आऱोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : २ हजारांवरील UPI व्यवहारांवर ०.४% शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मंत्रिमंडळात नाराजीचा सूर; बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं अन्...; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

शाळेतल्या मित्राने PM मोदींची भेट घेतली, आता भाजप आमदाराने मित्राच्या मुंबईतील जमिनीवरचा ताबा सोडला

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT