Ajit pawar  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Hasan Mushrif: शांत झोप लागते म्हणणाऱ्यांवर अजित पवारांचा निशाणा; म्हणाले, आमच्यासोबत...

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या ठिकाणांवर ईडीनं छापेमारी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या विविध ठिकाणांवर ईडीनं छापेमारी केली. यावरुन आता विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी थेट आपल्या आधीच्या सहकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. (ED action of Hasan Mushrif Ajit Pawar slams on previous colleague)

अजित पवार म्हणाले, "केंद्र सरकारच्या ज्या एजन्सी आहेत त्यांना देशातील कुठल्याही व्यक्तींची पूर्ण चौकशीचे अधिकार आहेत. त्याचबरोबर राज्य सरकारच्या अधिकारातील चौकशी यंत्रणांना देखील चौकशीचे अधिकार आहेत. पण आत्ता जे घडतंय ते पाहिल्यानंतर त्याला काही राजकीय रंग आहे का? अशी शंका उपस्थित होतं आहे. मधल्या काळात अनिल देशमुखांवर आरोप झाले पण त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नव्हते, त्यामुळं कोर्टानं त्यांना सोडलं. तसेच संजय राऊतांबाबतही हेच घडलं त्यामुळं अशा कारवाया महाराष्ट्र आणि भारताला परवडणाऱ्या नाहीत"

काही मान्यवरांनी जे पूर्वी आमच्याबरोबर होते ते आता सत्ताधारी पक्षाबरोबर गेले. तर आता त्यांनी अशी वक्तव्ये केली आहेत की, "आम्ही आता सत्ताधारी पक्षात आल्यामुळं आम्हाला शांत झोप लागते" मागे हर्षवर्धन पाटील जे आधी काँग्रेसमध्ये होते आता ते भाजपमध्ये आहेत त्यांनी असं विधान केलं होतं. त्यापूर्वी सांगलीच्या एका खासदारांनी असंच विधान केलं होतं. अशी वक्तव्ये आल्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होते. त्यामुळं नियम कायदा सर्वांसाठी सारखे असले पाहिजेत, असंही पवार यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

अटल टनेलजवळ भीषण अपघात, बोगद्यातून बाहेर येताच स्कॉर्पिओ थेट नदीत बांधकाम सुरू असलेल्या पिलरवर लटकली, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT