Sanjay Raut,Devendra Fadnavis and Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : मुश्रीफांचा 'तो' फोटो शेअर करत राऊतांचं सूचक ट्विट; म्हणाले, उद्याच देवेंद्रजींकडं..

आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल येथील निवासस्थानावर काल (शनिवार) सकाळी सक्तवसुली संचालनालयनं (ईडी) पुन्हा छापा टाकला.

सकाळ डिजिटल टीम

कारवाईनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सूचक ट्विट केलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल येथील निवासस्थानावर काल (शनिवार) सकाळी सक्तवसुली संचालनालयनं (ईडी) पुन्हा छापा टाकला.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना (Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory) प्रकरणाच्या चौकशीसाठी ही कारवाई झाल्याचं समजतं. दरम्यान, मुश्रीफ यांना ईडीनं चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. त्यानुसार मुश्रीफ यांना सोमवारी (ता. 13) ईडीच्या मुंबई कार्यालयात हजर रहावं लागणार आहे.

मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीनं दोन महिन्यांनंतर टाकलेला हा दुसरा छापा आहे. पथकानं मुश्रीफ कुटुबीयांची तब्बल साडेआठ तास चौकशी केली. मुश्रीफ घरी नसल्यानं त्यांच्या पत्नी सायरा व मुलगा आबीद तसंच कुटुंबातील अन्य सदस्य चौकशीला सामोरे गेले. दरम्यान, कारवाईचा कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला. या कारवाईनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सूचक ट्विट केलंय.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, मुश्रीफ यांच्या सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या संदर्भात ED ची कारवाई सुरू आहे. महात्मा पोपटलाल त्यावर बेंबीच्या देठापासून ओरडत आहे. अशा डझनावर साखर कारखान्यात जनतेच्या पैशाची लूट सुरू आहे. ED इथं गप्प का? उद्या एका भ्रष्ट कारखान्याचं प्रकरण देवेंद्रजींकडं (Devendra Fadnavis) पाठवीत आहे, असं त्यांनी सूचक ट्विट केलंय. या ट्विटव्दारे राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांचा पोपटलाल असा उल्लेख करत चांगलाच समाचार घेतला. आता उद्या राऊत फडणवीसांकडं कोणती माहिती देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

राज्य शालेय पोषण आहाराची परदेशात तस्करी? सीआयडीमार्फत चौकशीची मागणी, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT