Hasan Mushrif Esakal
महाराष्ट्र बातम्या

Hasan Mushrif Ed raid : हसन मुश्रीफ यांच्या मुलीच्या घरावरही ईडीची छापेमारी

राष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीने छापेमारी केली

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. सकाळी साडेसहा वाजता अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी पोहचले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर कागलमधील घरावर ईडीचे छापे पडले. जवळपास २० अधिकारी मुश्रीफांच्या घरी पोहचले आहेत.

हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या मुलीच्या घरीही ईडीने छापेमारी केली आहे. हसन मुश्रीफ यांच्यासह त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या घरावर आणि मुलीच्या घरावर ईडीने छापे मारल्याची माहिती समोर आली आहे. हसन मुश्रीफ यांच्या कन्या नाविदा मुश्रीफ यांच्या घरीही ईडीने छापेमारी केली आहे.

हे ही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

नाविदा यांच्या पुण्यातील घरी ईडीच्या टीमने छापेमारी केली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात असणाऱ्या अशोका सोसायटीमध्ये ईडीने छापेमारी केली आहे. आज सकाळी 7.30 वाजल्यापासून ईडीचेअधिकारी या सोसायटीमध्ये दाखल झाले. ईडीच्या 5 अधिकाऱ्यांकडून चौकशी नाविदा यांची चौकशी करण्यात आली आहे.

हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आलेले आरोप

हसन मुश्रीफ यांनी ग्रामविकास मंत्री असताना 1500 कोटी रुपयांचे कंत्राट त्यांच्या जावयाच्या बनावट कंपनीला दिले. मी याचे पुरावे दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी मुश्रीफांना हे कंत्राट रद्द करण्यास सांगितले आहे. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून 158 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केला. 2019 मध्ये धाडी पडल्या होत्या. मंत्री असताना मुश्रीफ यांनी आणखी अफरातफर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT