Arjun Khotkar 
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेच्या अडचणीत वाढ! अर्जुन खोतकरांवर ईडीची मोठी कारवाई

सकाळ डिजिटल टीम

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता ईडीकडून शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. शिवसेनेचे नेत अनिल परब यांची चौकशी ईडी करत आहे यादरम्यान आता अर्जुन खोतकर यांच्यावर देखील ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. (ed big action on shivsena leader arjun khotkar)

जालना येथील साखर कारखान्यावर ईडीने धाड टाकली आहे. या कारवाईत कारखान्याची २०० एकर जमीन, कारखान्याची इमारत, कारखान्याची यंत्रसामग्री ताब्यात घेण्यात आली आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर संचालक असलेला हा कारखाना आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे सहकारी साखर कारखान्यांच्या बेकायदेशीर लिलावाशी संबंधित प्रकरणात ED ने ही कारवाई केली आहे. PMLA अंतर्गत सावरगाव हडप, तालुका आणि जिल्हा जालना येथील जालना सहकारी साखर कारखाना लि.ची जमीन, इमारत आणि यंत्रसामग्री जप्त केली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील घर, कार्यालय यावर ईडीने छापा टाकला होता, तसेच या व्यवहाराशी संबंधीत एका बिल्डरावर औरंगबाद येथे आणि कारखान्याचे मालक यांच्यावर छापेमारी केली होती, त्यानंतर ईडीने जमीन, इमारत आणि यंत्रसामग्री संलग्नित करण्याचा निर्णय घेतला होता.

माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत ईडीने नेमकी कारवाई काय केली ते मला माहिती नाही, प्रवासात असे खोतकरांनी सांगितले. ईडीला कारवाई करण्याचा आधिकार आहे, त्याविरोधात कोर्टात लढू असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-EU Trade Deal : 18 वर्षांची प्रतीक्षा संपली! भारत-युरोप करार झाला, तुमच्यासाठी आता काय स्वस्त होईल?

Kolhapur Politics : कोल्हापुरात भाजपला खिंडार? इंगवले गट एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत करणार प्रवेश

बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच राधा पाटील पलटली? आता म्हणते, 'तो माझा पास्ट होता' व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Mumbai Fire: मालाड मधील मालवणीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; ६ जण गंभीर जखमी

U19 World Cup : ४ चौकार अन् ४ षटकारांसह वैभव सूर्यवंशीने विक्रमी फिफ्टी झळकावली, पण मोठा शॉट मारण्याच्या नादात झाला आऊट

SCROLL FOR NEXT