Shivsena Sakal
महाराष्ट्र बातम्या

एकीकडे राऊत ईडीच्या ताब्यात तर दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदेंवर पुष्पवृष्टी

हा विरोधाभास सध्या राज्यात पाहायला मिळत आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना आज तब्बल नऊ तासाच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर औरंगाबादेत पुष्पवृष्टी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शक्तिप्रदर्श करण्यासाठी ते दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्यावर पृष्पवृष्टी होत असून एकीकडे शिवसेना नेत्याला ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं आहे तर दुसरीकडे शिंदे यांच्यावर पुष्पवृष्टी होत आहे हा विरोधाभास सध्या राज्यात पाहायला मिळत आहे.

दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात टांगती तलवार असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना नऊ तासाच्या चौकशीनंतर अखेर आज ईडीकडून ताब्यात घेण्यात आले आहे. राऊतांच्या घरी आज सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं होतं. त्यांचे भाऊ सुनील राऊत आणि पत्नी यांच्यासहित त्यांची चौकशी तब्बल २५ ईडीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती.

शिवसेनेतून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन झाल्यामुळे मूळ शिवसेना आणि शिंदे गटातील वाद टोकाला गेला आहे. त्याचबरोबर एकमेकांवरील आरोप प्रात्यारोपही कमी झालेले नाहीत. शिवसेनेतील आमदार खासदारांसहित अनेक नेते शिंदे गटात दाखल झाले आहेत. ईडीच्या भितीमुळे नेते शिंदे गटात दाखल होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत होता. त्यानंतर, "ईडीच्या भितीने जर कुणी आमच्याकडे येत असेल तर कुणीही येऊ नये." असा इशारा शिंदे यांनी आज केला आहे.

त्यानंतर ईडीकडून रडारवर असलेले संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर औरंगाबादेत पुष्पवृष्टी सुरू आहे. यामुळे शिवसेनेतील दोन राजकीय बाजू आपल्याला आज पहायला मिळाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ''देशमुख प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम नको'', आरोपींकडून कोर्टात अर्ज; कारणही सांगितलं

गोलाला छोटा भाऊ मिळाला! भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, घरी पुन्हा किलबिलाट

Latest Marathi News Live Update : नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी मधील कंपनीत अपघात

Putrada Ekadashi 2025: यंदा 30 की 31 डिसेंबर कधी आहे पुत्रदा एकादशी? जाणून घ्या अचूक तारीख, पूजाविधी आणि धार्मिक महत्त्व

Asia Cup U19: भारताने दिलेली जखम पाकिस्तानच्या जिव्हारी! उपांत्य फेरीत न खेळताच जाणार घरी; बांगलादेश फायनलला पोहोचणार

SCROLL FOR NEXT