Ajit-Pawar-and-Sunetra-Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात नवा ट्विस्ट; आरोपपत्रातून अजित-सुनेत्रा पवारांचं नाव काढलं?

ईडीने अजित पवार सुनेत्रा पवारांना क्लीनचिट दिल्याच्या चर्चा

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केलं आहे. मात्र या आरोपपत्रात अजित आणि सुनेत्रा पवारांचं नावच नाही आहे. 2021 मधे सक्तवसुली संचालनालयाने या घोटाळ्याप्रकरणी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या जवळपास 65 कोटींची मालमत्ता जप्त केली होती.

अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांशी संबंधित कंपनीच्या विरोधात हे आरोपपत्र आहे. मात्र आरोपपत्रात अजित आणि सुनेत्रा पवारांचं नाव नाही. त्यामुळे आता याविषयी आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.

ईडीने आता अजित पवारांशी संबंधित या कंपनीला आरोपी बनवलं आहे. कंपनीच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केलं आहे. हे पुरवणी आरोपपत्र आहे. मात्र, त्यात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा साधा उल्लेखही नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार यांना ईडीने क्लीनचिट दिली की काय? अशी चर्चा रंगली आहे. या संबधीचे वृत्त टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनेने दिले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीने पुरवणी आरोपपत्रं दाखल केलं आहे. या घोटाळ्याप्रकरणी जरंडेश्वर साखर कारखान्याची 65.75 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. 2021मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. या घोटाळ्यात स्पार्कलिंग सॉइल लिमिटेड या कंपनीचं नाव आलं होतं.

संबधित कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचं सांगितलं जात होतं. पण ईडीने या प्रकरणी अजित पवार यांची एकदाही चौकशी केली नाही. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना साधं समन्सही बजावलं नाही. आता ईडीने स्पार्कलिंग सॉइल कंपनीला आरोपी बनवलं आहे. या कंपनीविरोधात ईडीने पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. पण अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा या आरोपपत्रात साधा उल्लेखही नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

अजित पवार यांनी मात्र नाव वगळ्याचं वृत्त फेटाळलं आहे. ईडी प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अद्याप क्लीन चीट दिलेली नाही. माझ्या माहितीनुसार चौकशी सुरु आहे असं अजित पवार म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT