एकनाथ खडसे 
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ खडसे यांच्या पत्नीला पुन्हा ईडीची नोटीस

सकाळ वृत्तसेवा

एकनाथ खडसे यांच्या अडचणींत आणखी भर...

जळगाव : भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी तथा जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांना बुधवारी (ता. १८) ‘ईडी’च्या कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविण्यात आले आहे. एमआयडीसीची जमीन मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केली आहे. याप्रकरणी चौधरी यांना अटक झाली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. खडसे यांना यापूर्वीच चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यांनी त्यासाठी मुदत मागून घेतली होती. आता त्यांना उद्या हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना यापूर्वीही ईडीने हजर राहण्याबाबत नोटीस बजावली होती. पण, प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी हजर राहता येणार नसल्याचे कळविले होते. पहिली नोटीस बजावून बरेच दिवस झाल्यामुळे आता ईडीने पुन्हा नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली आहे. गेल्या आठवड्यात जिल्हा सहकारी बँकेलाही या प्रकरणी नोटीस बजावली होती. संत मुक्ताई शुगर कारखान्यास कर्ज दिल्याप्रकरणी कागदपत्रे सादर करण्यास जिल्हा सहकारी बँकेला सांगितले होते.

काय आहे भोसरी जमीन प्रकरण?

पुणे शहरालगत भोसरी एमआयडीसीत ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाताई व जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी करण्यात आली. या व्यवहारात खडसेंनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप होता. कोट्यवधींची जमीन कवडीमोल दरात खरेदी करण्यात मोठा गैरव्यवहार झाल्याची फिर्यादही याप्रकरणी नोंदविण्यात आली होती. भोसरी येथील जमिनीची किंमत सुमारे ४० कोटी रुपये असताना ती केवळ ३.७५ कोटी रुपयांना खडसे यांच्या कुटुंबीयांना विकण्यात आल्याचा आरोप केला होता. न्या. झोटिंग समितीने या प्रकरणाची चौकशी केली, सोबतच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशी करून खडसेंना क्लीन चीट दिली होती. झोटिंग समितीचा अहवाल खडसेंनी वारंवार मागणी करूनही जाहीर झाला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

SCROLL FOR NEXT