anandrao adsul google
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेच्या माजी खासदारांना ED ची नोटीस, हजर राहण्याचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेच्या अनेक नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawali) आणि मंत्री अनिल परब (minister anil parab) यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. आता परत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (former mp Anandrao Adsul) यांना ईडीकडून समन्स बजाविण्यात आले आहे. सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आनंदराव अडसूळ यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे अडसूळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

'सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, ९९ टक्के मराठी लोकांचे खाते होते. जवळपास ९ हजार खातेधारक होते. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळे बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला आहे. दोन वर्षांपूर्वी एफआयआर झाले आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्यामुळे ही चौकशी केली नव्हती', असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यानंतर आनंदराव अडसूळ यांची ईडीची चौकशी सुरू झाली आहे.

दरम्यान, आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या खोट्या जातपडताळणी प्रमाणपत्राचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाने देखील आनंदराव अडसूळ यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच ईडीकडून पहिलं समन्स बजाविण्यात आले होते, असा आरोप अभिजीत अडसूळ यांनी केला आहे. राणा दाम्पत्याचे वरपर्यंत संबंध आहे. त्यामुळे ईडीकडून चौकशी केली जात असल्याचा आरोप अभिजीत अडसूळ यांनी 'एबीपी माझा'सोबत बोलताना केला.

अडसूळांनी फेटाळले आरोप -

सीटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी फेटाळून लावला आहे. सीटी बँकेत ८०० कोटींची उलाढाल होती. मग, ९८० कोटींचा घोटाळा कसा काय होऊ शकतो? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आज सकाळीच ईडीचे अधिकारी माझ्या घरी आलेत. त्यांनी मला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्याचे स्वतः अडसूळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT