मुंबई : शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा (ED notice to anil parab) एकदा समन्स बजाविला आहे. येत्या २८ सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदविण्यास सांगितलं आहे. १०० कोटी वसुलीचे आरोप असलेल्या अनिल देशमुख प्रकरणी (Anil Deshmukh Case) चौकशीसाठी हे समन्स पाठविल्याची माहिती आहे. ईडीने दुसऱ्यांदा समन्स पाठविल्यामुळे अनिल परब यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
सोमय्या यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. तसेच प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) बदल्यांचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोप केला होता. त्याबाबतचे पुरावे त्यांनी सक्तवसुली संचालनालय व आयकर विभागाला दिले होते. तसेच अनिल देशमुख प्रकरणात देखील अनिल परबांचा हात असल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यानंतर २९ ऑगस्टला पहिलं समन्स पाठविलं होतं. अनिल देशमुख यांच्यावर असलेल्या १०० कोटी वसुली प्रकरणी पहिलं समन्स बजाविण्यात आलं होतं. आता देखील त्याचप्रकरणी नोटीस बजाविल्याची माहिती आहे. त्यावेळी मात्र नियोजित कार्यक्रमांचं कारण देत जबाब नोंदविण्यासाठी वेळ देण्याची मागणी त्यांनी केली होती. आता परत ईडीने समन्स बजाविलं आहे.
किरीट सोमय्या काय म्हणाले?
अनिल परब यांना ईडीने समन्स बजाविले आहे. आता ते २८ सप्टेंबरला ईडीसमोर हजर राहतील, अशी आशा आहे, असं किरीट सोमय्या यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.