Sanjay Raut
Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र

पत्राचाळ प्रकरण : राऊतांचे निकटवर्तीय सुजित पाटकरांना EDचे समन्स

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पत्राचाळ मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात संजय राऊत यांचीही चौकशी करण्यात आली होती. आपल्यावर कर नाही तर डर कशाला असं म्हणत संजय राऊत या चौकशीला समोर गेले होते. त्यानंतर आता पाटकर यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

(ED summons to Sanjay Raut's close aide Sujit Patkar)

दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नीच्या नावावर पैसे आले असा दावा ईडीने केला होता. त्याचबरोबर अलिबागचा प्लॉट घेण्यासाठी बऱ्यापैकी रोख पैशाचा वापर करण्यात आला होता असा दावा ईडीने केला होता. तसेच संजय राऊतांचे दादरमधील फ्लॅटही ईडीच्या रडारवर आहे. या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशीसाठी वेळ लागत असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं होतं. राऊतांच्या चौकशीनंतर आता त्यांच्या निकटवर्तीयांची चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे.

काय आहे पत्राचाळ घोटाळा प्रकरण?

गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्वसनासाठी प्रविण राऊत यांची मे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनी पुढे आली होती. राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रविण राऊत यांचं या कामासाठी म्हाडासोबत कंत्राट झालं होतं. म्हाडा भाडेकरूंना घरे न बांधताच प्रविण राऊत यांच्या कंपनीने ९ विकास कामांना ९०१ कोटींना एफएसआय विकला आणि मेडोज नावाचा प्रोजेक्ट सुरू केला. त्याच्या नावाखाली या कंपनीने १३८ कोटी रूपये जमा केले होते. त्यानंतर म्हाडाच्या इंजिनिअरने तक्रार केल्यानंतर या कंपनीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

या चौकशीत १०३९.७९ कोटी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचं चौकशीत उघड झालं. त्यामधील १०० कोटी रूपये प्रविण राऊत यांच्या अकाऊंटवर जमा झाल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम प्रविण राऊत यांनी जवळच्या नातेवाईकांच्या खात्यावर ट्रान्सफर केली होती. त्यातील ५५ लाख रूपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर जमा झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं आहे आणि याची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT