STUDENTS
STUDENTS file photo
महाराष्ट्र

असा असेल दहावीच्या निकालाचा पॅटर्न!

कार्तिक पुजारी

दहावीच्या परीक्षांबाबतची संभ्रम आता दूर झाल्यात जमा आहे. कारण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे होईल, याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

मुंबई- दहावीच्या परीक्षांबाबतची संभ्रम आता दूर झाल्यात जमा आहे. कारण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे होईल, याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. हायकोर्टाने दहावीची परीक्षा रद्द केल्याच्या मुद्द्यावरुन सरकारला झापलं होतं. गायकवाड यांनी याआधी ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्याचं म्हटलं होतं. विद्यार्थ्यांचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचं असल्याचं गायकवाड म्हणाल्या होत्या. त्यामुळे शिक्षणमंत्री नेमका काय निर्णय घेतात याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागली होती. आज पत्रकार परिषद घेत वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी आणि पालकांमधील संभ्रम दूर केलाय. (education minister varha gaikwad Announced 10 exam New assessment method)

असा असेल दहावीच्या निकालाचा पॅटर्न

-दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विषयांचे 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात येणार.

-10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन :30 गुण

-गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या आधारे 20 गुण दिले जातील

- नववीच्या निकालाच्या आधारे 50 गुण दिले जातील

- या नव्या मूल्यमापनावरील आधारित निकालावर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांना, कोरोना संसर्ग संपल्यानंतर दोन वेळा परीक्षेची संधी देण्यात येईल

-विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकाच्या अध्यक्षेतेखाली 7 सदस्यीय निकाल समिती असेल.

- मंडळामार्फत जून अखेर निकाल घोषित करण्याचा मानस आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT