Varsha Gaikwad. 
महाराष्ट्र बातम्या

Breaking ! पहिली ते चौथीची शाळा दोन महिनेच ! यंदा अंगणवाडी बंदच; दहावी-बारावी परीक्षेसाठी "एवढाच' अभ्यासक्रम

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून आणि दुसरीकडे प्रतिबंधात्मक लसही आली आहे. या पार्श्‍वभूमीवर 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. आता 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत येणे पसंत केल्याचे चित्र आहे. त्यानंतर आता राज्याची परिस्थिती पाहून 1 मार्चपासून पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा यापूर्वीच जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे या कालावधीत तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे या कालावधीत होणार आहे. यंदा शाळा उशिरा सुरू झाल्याने बोर्ड परीक्षेसाठी 25 टक्के अभ्यासक्रम कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, 40 टक्के अभ्यासक्रम कपातीची चर्चा होती. त्याला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पूर्णविराम दिला असून, 25 टक्केच अभ्यासक्रम कपात करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. दुसरीकडे त्या म्हणाल्या, तूर्तास अंगणवाडी व बालवाडी यंदा सुरू करण्याचे नियोजन नसून आगामी शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू करण्याच्या दृष्टीने ठोस नियोजन सुरू आहे. शैक्षणिक वर्ष सुरू करताना शाळा सुरू न झाल्याने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शाळा दोन महिने (1 मार्च ते 30 एप्रिल) भरविण्याचे नियोजन केले जात आहे. त्याबाबत 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. कठीण काळातही शिक्षक, मुख्याध्यापक, सर्वजण उत्तम काम करत असून आजवर एकही मुलगा कोरोनाच्या विळख्यात सापडला नसल्याचे त्यांनी कौतुकही केले. 

शाळांची स्थिती... 

  • (पाचवी ते आठवी) 
  • एकूण शाळा : 1,06,491 
  • एकूण विद्यार्थी : 78,47,000 
  • शिक्षक संख्या : 1,72,623 
  • शिक्षकेतर कर्मचारी : 30,574 
  • (नववी ते बारावी) 
  • एकूण शाळा : 22,204 
  • एकूण विद्यार्थी : 56,48,028 
  • एकूण शिक्षक : 2,27,775 
  • एकूण शिक्षकेतर कर्मचारी : 92,343 
  • (पहिली ते चौथी) 
  • एकूण शाळा : 1,34,936 
  • एकूण विद्यार्थी : 1.26 कोटी 

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या... 

  • कोरोनाचा संसर्ग कमी झाला आणि प्रतिबंधात्मक लस आली म्हणून नववी ते बारावी आणि आता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू केले 
  • पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलांची उपस्थिती पाहून घेतला जाईल पहिली ते चौथीच्या शाळांचा निर्णय 
  • मार्चपासून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचे नियोजन; सुरू झालेल्या शाळांचा दररोज घेतला जातोय आढावा 
  • दररोज तीन तास, तीन विषयांनाच दिले जात आहे प्राधान्य; मुलांच्या आरोग्याला पहिले प्राधान्य, अंगणवाडी, बालवाडी यंदा सुरू होणार नाहीत 
  • पाचवी ते बारावीपर्यंतच्या एक लाख 28 हजार 695 पैकी 68 टक्के शाळा सुरू झाल्या असून एक कोटी 34 लाख 95 हजार 28 पैकी 34 लाखांहून अधिक विद्यार्थी शाळेत येत आहेत 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijeta Dahiya: कोण आहेत विजेता दहिया? बर्गर खाल्ल्यामुळे 'सीजेपी'चं प्रवक्तेपद गमावलं, व्हिडीओ झाला होता व्हायरल

Mulshi Dam Water : मुळशी धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत ८ हजार १०० क्यूसेक्सने विसर्ग सुरू.....

Pune Water Supply : पुण्यात पाणी कपात नाही! महापौर मंजूषा नागपुरेंची घोषणा

CJP च्या 'जंतरमंतर'वरील आंदोलनाने वेधले लक्ष! रोहित शर्मा, सूर्या आणि बुमराहच्या पत्नींची प्रतिक्रिया चर्चेत

Sonam Wangchuk: 'या' अटी मान्य झाल्यास उपोषण सोडेन; रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचे सरकारला पत्र, तोडगा निघणार?

SCROLL FOR NEXT