RTE admission

 
esakal
महाराष्ट्र बातम्या

शिक्षणाधिकारीही चक्रावले! ‘आरटीई’तून इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील मोफत प्रवेशासाठी दिले बनावट भाडेकरार; प्राथमिक शिक्षणाधिकारी भाडेकरारातील घरी अन्‌...

नामांकित इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमधील मोफत प्रवेशासाठी अनेक पालकांनी बनावट भाडेकरार जोडून ‘आरटीई’तून अर्ज केले आणि प्रवेशही घेतल्याची बाब शिक्षणाधिकाऱ्यांच्या गृहभेटीतून समोर आली आहे. आता त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येणार असून त्यासंदर्भातील अहवाल प्राथमिक शिक्षण संचालकांना पाठविण्यात येणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : नामांकित इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमधील मोफत प्रवेशासाठी अनेक पालकांनी बनावट भाडेकरार जोडून ‘आरटीई’तून अर्ज केले आणि प्रवेशही घेतल्याची बाब शिक्षणाधिकाऱ्यांच्या गृहभेटीतून समोर आली आहे. आता त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येणार असून त्यासंदर्भातील अहवाल प्राथमिक शिक्षण संचालकांना पाठविण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील २८६ इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये दोन हजार ७८२ विद्यार्थ्यांना ‘आरटीई’तून मोफत प्रवेश मिळणार आहेत. त्यासाठी सात हजारांपर्यंत अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील अनेक पालक शहरात किंवा शाळेपासून पाच ते १० किलोमीटर अंतरावर राहतात, तरीही त्यांनी प्रवेशासाठी बनावट भाडेकरार करून अर्ज केले आहेत. त्यासाठी त्यांनी संबंधित घरमालकास काही हजार रुपये दिले आहेत.

पुणे, सोलापूरसह राज्यातील बहुतेक जिल्ह्यांतून अशा तक्रारी झाल्या असून त्यात तथ्यही आढळले आहे. सोलापूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी माळशिरस तालुक्यातील काही गावांमधील विद्यार्थ्यांच्या अर्जांतील भाडेकरारावरील घरांना भेटी दिल्या. त्यावेळीही पालकांची बनवेगिरी समोर आली आहे.

कागदपत्रे पडताळणीनंतर कारवाई निश्चित

माळशिरस तालुक्यातील काही पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. अनेक पालकांनी बनावट भाडेकरार जोडून त्यांच्या पाल्यांचे ‘आरटीई’तून प्रवेश घेतल्याचे तक्रारीत नमूद होते. १३ विद्यार्थ्यांच्या अर्जांसोबत जोडलेल्या भाडेकरारातील घरांना भेटी दिल्या. त्यावेळी काही जण तेथे राहत नसल्याचे आढळले, तर काहींनी नातेवाइकांच्याच घरात राहत असल्याचे दाखवून भाडेकरार केल्याचेही निदर्शनास आले.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

किलोमीटरचे अंतर नियमात बसावे म्हणून...

ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न साडेतीन लाखांपेक्षा कमी आहे, त्यांच्या पाल्यांना ‘आरटीई’तून लॉटरीद्वारे मोफत प्रवेश मिळतो. मात्र, त्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे घर आणि शाळा यांतील अंतर १ ते ३ किलोमीटरपर्यंत असावे, अशी अट आहे. हा निकष पूर्ण करण्यासाठी अनेक पालकांनी नातेवाइक, मित्र-मैत्रिणी किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या घरात राहत असल्याचे दाखवून बनावट भाडेकरार केले आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या पडताळणीत ही बाब समोर आली आहे. भाडेकरारातील घर आणि पालकांचे मूळ घर यांतील अंतर एक ते दीड किलोमीटर असल्याचेही दिसून आले. काही घरे उघडी होती, पण तेथे संबंधित पालक राहत नसल्याचेही आढळल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

तक्रार आली की पडताळणी...

‘आरटीई’तून प्रवेश मिळावा म्हणून कोणी बनावट भाडेकरार जोडून अर्ज केल्याची माहिती असल्यास त्यांनी थेट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करावी, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केले आहे. त्यानुसार संबंधित अर्जदाराच्या भाडेकरारातील घरांना अचानक भेटी दिल्या जातील. त्यावेळी वस्तुस्थिती पडताळून त्या पालकांवर कारवाई केली जाईल आणि संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जातील, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT