Scholarship Exam Sakal media
महाराष्ट्र बातम्या

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा कधी ?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra state exam council) पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा कधी होणार, असा सवाल शिक्षण क्रांती संघटनेने केला आहे, तसेच नियोजन करून परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली आहे. परिषदेने यंदा शिष्यवृत्ती परीक्षांची (scholarship exam) तारीख २० फेब्रुवारीला जाहीर केली होती, परंतु ही तारीख पुढे ढकलून सुधारित वेळापत्रक (timetable) नंतर जाहीर केले जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती.

मात्र अद्यापही कोणतीही घोषणा झाली नसून परीक्षेची तयारी करणारे लाखो विद्यार्थी संभ्रमात असल्याचे संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस यांनी सांगितले. राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या लेखी परीक्षा सुरू असून १५ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत, त्यानंतर लगेचच पहिली ते नववी, अकरावी या वर्गाच्या परीक्षा सुरू होतात.

त्यानंतर लगेच शाळांना उन्हाळी सुट्टी सुरू होते. या सुट्टीच्या काळात विद्यार्थी अभ्यास करण्याच्या मानसिकतेत नसतात. या बालमानसिकतेचा विचार करून उन्हाळी सुट्टीच्या अगोदरच या दोन्ही शिष्यवृत्ती परीक्षा घ्याव्यात. याकरीता तातडीने परीक्षेची तारीख जाहीर करावी जेणेकरून विद्यार्थी पूर्वतयारी करू शकतील, अशी मागणी घागस यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT