

NMMC
ESakal
नवी मुंबई : निवडणूक आयोगाने मतदार यादी शुध्दीकरण करण्यासाठी SIR योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत बनावट, बोगस, मयत मतदार शोधून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येत आहेत. ही योजना राबवत असताना नवी मुंबई महापालिकेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महानगरपालिका कार्यालयाच्या पत्त्यावर २७ मतदारांची नोंद असल्याचे उघडकीस आले आहे.