Maratha Reservation File photo
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीत टिकण्यासाठी प्रयत्न

राज्यातील मराठा समाजाला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आरक्षण दिले होते. राज्य सरकारचा हा निर्णय पुढे सर्वोच्च न्यायालयात टिकू शकला नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यातील मराठा समाजाला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने आरक्षण दिले होते. राज्य सरकारचा हा निर्णय पुढे सर्वोच्च न्यायालयात टिकू शकला नाही. मात्र राज्य सरकार सध्या मराठा आरक्षणावर काम करत असून, कायद्याच्या कसोटीत मराठा आरक्षणाचा निर्णय कसा टिकेल, या दृष्टीने याबाबत सरकार प्रयत्न करत असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.९) पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण समारंभासाठी अजित पवार पुण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण आंदोलनाबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण देण्याच्याच बाजूने राज्य सरकार आहे.

त्यानुसार या आरक्षणाबाबत सरकार सध्या काम करत असून, याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा एक बैठक बोलावली होती. या बैठकीला मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते.परंतु, मी शहराबाहेर असल्यानं बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही.’’

जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे एक शिष्टमंडळ काल मुंबईला गेले होते. या शिष्टमंडळाने काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः मनोज जरांगे यांच्याशी बोलत आहेत.

याप्रकरणी सरकारने अध्यादेशसुद्धा प्रसिद्ध केला आहे. पण हा अध्यादेश जरांगे यांना मान्य नाही. सरकारने निर्णय घेतला असला तरी, जरांगे यांना हा निर्णय पटला पाहिजे. पण आम्ही त्यांना समजावण्यात कमी पडत आहोत, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

पवारांचा चंद्रकांत पाटलांना वेळेबाबत सल्ला

पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे दोन्ही ‘दादा’ सुमारे आठवडाभराच्या खंडानंतर शनिवारी एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. दरम्यान, अजित पवार हे वेळेची शिस्त पाळणारे नेते म्हणून ओळखले जातात.

यानुसार ते आजच्या या कार्यक्रमाला बरोबर वेळेत हजर झाले. पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या कार्यक्रमाला वेळेत आलेले नव्हते. पालकमंत्री पाटील हे हा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर २० मिनिटे उशिरा कार्यक्रमस्थळी पोचले. परंतु त्याआधीच अजित पवार यांनी अगदी वेळेत कार्यक्रम सुरु करत, भाषणही सुरु केले होते.

पवार यांचे भाषण चालू असतानाच चंद्रकांत पाटील हे कार्यक्रमस्थळी आले. त्यामुळे आपल्या भाषणाच्या शेवटी अजित पवार यांनी उशिरा येण्यावरून सर्वांसमोर चंद्रकांत पाटील यांना वेळ पाळण्याबाबतचा अप्रत्यक्षपणे सल्ला दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT