Solapur News esakal
महाराष्ट्र बातम्या

पोषण आहारात आता अंडी व केळी! दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टीतही पोषण आहार; उर्वरित तालुक्यातील विद्यार्थ्यांना नाही

दिवाळी सुट्ट्यांमध्ये जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा व बार्शी या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जाणार आहे. शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आहार मिळणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : दिवाळी उत्सवाच्या १४ दिवस शाळांना सुट्ट्या आहेत. या दिर्घ मुदतीच्या सुट्ट्यांमध्ये जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा व बार्शी या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जाणार आहे. शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना हा पोषण आहार दिला जाणार आहे. दुसरीकडे दुष्काळही निकषांनुसार जिल्ह्यातील उर्वरित सहा तालुक्यातील विद्यार्थ्यांना या सुट्ट्यांमध्ये पोषण आहार मिळणार नाही.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ दिला जातो. पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्रथिनेयुक्त आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ७०० उष्मांक व २० ग्रॅम प्रथिनेयुक्त मध्यान्ह भोजन दिले जाते. सध्या तांदुळापासून तयार केलेल्या पाककृतीच्या स्वरुपात हा आहार मिळतो.

दरम्यान, अंड्यातील पौष्टिक मूल्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी व अंडी उत्पादक शेतकऱ्यांना राज्याअंतर्गत स्थानिक बाजारपेठ मिळावी म्हणून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पोषण आहारात अंड्याचा समावेश करण्याचा निर्णय मंगळवारी (ता. ७) शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

बचत गटाच्या माध्यमातून त्याचा पुरवठा होईल. दरम्यान, प्रत्येक विद्यार्थ्यास प्रत्येक आठवड्यातील बुधवार किंवा शुक्रवारी आहारासोबतच शिजवलेले एक अंडे दिले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९५ शाळा तर ‘माध्यमिक’च्या अनुदानित एक हजार ५४ शाळांमधील आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी निर्णय

अंड्यात उच्च प्रतिचे प्रथिने, उष्मांक, जीवनसत्त्वे, लोह, कॅल्शियम, कार्बोहायड्रेड असतात. त्यामुळे अंड्याचा आहारात समावेश केल्यास विद्यार्थ्यांची वाढ व रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल, असा विश्वास सरकारला आहे. दुसरीकडे अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी किंवा स्थानिक फळ दिले जाणार आहे. त्याच्या नोंदी ठेवल्या जातील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना सुट्टीतही पोषण आहार

जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळी निकषांप्रमाणे त्या पाच तालुक्यांमधील शासकीय व अनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टीतही पोषण आहार दिला जाणार आहे. दिवाळीनंतर आहारात अंडी व केळी, याची वाढ होणार आहे.

- प्रसाद मिरकले, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women T20 World Cup: T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम INDIA ची एन्ट्री पक्की? फक्त 'या' ३ गोष्टी आणि इतिहास घडणार!

NEET-UG पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल; १७ वर्षीय विद्यार्थ्यानं सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं

क्रीडा विश्वातील 'शू सायन्स': खेळाडूंच्या बुटांचे तळवे प्रत्येक खेळानुसार का बदलतात ? जाणून घ्या त्यामागचं विज्ञान!

Viral Video: ''सगळ्यांना पप्पा आहेत.. मम्मी म्हणत होती दारु पिऊ नका, पण तुम्ही ऐकलं नाही'', वडिलांच्या फोटोसमोर चिमुकलीची नाराजी

Latest Marathi News Live Update: ब्रम्हगाव प्रकरणातील मागण्या मान्य; भिमाशंकर यादव यांचे उपोषण स्थगित

SCROLL FOR NEXT